AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday | बहिणीनेच केलेला अनन्या पांडेचा मोबाईल नंबर लीक, वाचा पुढे काय-काय घडलं….

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनन्याकडे सध्या नव्या प्रोजेक्ट्सची अक्षरशः रांग आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे.

Ananya Panday | बहिणीनेच केलेला अनन्या पांडेचा मोबाईल नंबर लीक, वाचा पुढे काय-काय घडलं....
अनन्या पांडे
| Edited By: | Updated on: Mar 20, 2021 | 8:39 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनन्याकडे सध्या नव्या प्रोजेक्ट्सची अक्षरशः रांग आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. अनन्या दररोज सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अलीकडेच अनन्याची चुलत बहिण अलाना पांडे भारतात आली होती. या दरम्यान अनन्या आणि तिची बहीण रायसा यांच्यासोबत अलाना पांडे भारतात व्लॉग शूट केला असून, यात रायसाने एक मोठा खुलासा केला आहे. रायसाच्या या कृत्यामुळे अनन्या भल्या मोठ्या अडचणीत सापडली होती (Sister Rysa leaked ananya panday personal mobile number on internet).

अभिनेता चंकी पांडे यांच्या घरी या तिन्ही बहिणी जमल्या होत्या. व्हिडिओमध्ये रायसाने सांगितले की, तिने एकदा अनन्याचा फोन नंबर इंटरनेटवर शेअर केला होता. रायसा हिला भविष्यात चित्रपट निर्माता व्हायचे आहे आणि यूट्यूबवर ती असे व्लॉग आणि लघुपट अपलोड करत असते. एकदा रायसाने अशीच एक शॉर्टफिल्म सोशल मीडियावर शेअर केली होती. अनन्याचे काही वैयक्तिक तपशीलही त्यात दिसत असल्याचे, तेव्हा तिच्या लक्षातच आले नाहीत. मात्र, स्वतःची चूक समजल्यावर रायसा म्हणाली, ‘मी दीदीचा नंबर लीक केला आहे’.

अनन्या झाली त्रस्त!

यावर बोलताना अनन्याने सांगितले की, माझा मोबाईल नंबर चित्रपटाच्या एका भागात दिसत होता आणि लोकांना हे कसे कळले ते, मला समजले नव्हते. दरम्यान मला भरपूर कॉल येऊ लागले. त्यानंतर रायसाने तो व्हिडीओ हटवला आणि पुन्हा एकदा अपलोड केला (Sister Rysa leaked ananya panday personal mobile number on internet).

पाहा अनन्याचे फोटो!

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

(Sister Rysa leaked ananya panday personal mobile number on internet)

विजय देवरकोंडासोबत झळकणार!

अभिनेत्री अनन्या पांडेने कमी अद्याप चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी तिची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे. अनन्या पांडे काही काळापूर्वी अभिनेता ईशान खट्टरसमवेत ‘खाली-पिली’ या चित्रपटात दिसली होती.

अनन्या लवकरच ‘लायगर’ चित्रपटात विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. अनन्या आणि विजय देवरकोंडा या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत त्या दोघांचेही चाहते पडद्यावर ही जोडी पाहण्यास उत्सुक आहेत. आजकाल दोन्ही कलाकार एकमेकांचे कौतुक करताना थकत नाहीयत. अनन्या अनेक वेळा विजयचे कौतुक करताना दिसली आहे. अभिनेत्रीने म्हटले आहे की, ती विजयसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

अनन्याकडे चित्रपटांची रांग

पॅन-इंडिया चित्रपटात काम मिळवणारी सर्वात तरुण अभिनेत्रीचा ‘लायगर’ पुरी जगन्नाथ दिग्दर्शनाखाली बनत आहे. सध्या तिच्याकडे आणखी एक चित्रपट आहे, शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात ती अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसह स्क्रीन शेअर करणार आहे. अनन्याच्या या चित्रपटाचे चाहतेदेखील प्रतीक्षा करत आहेत. अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

(Sister Rysa leaked ananya panday personal mobile number on internet)

हेही वाचा :

Nikki Tamboli | ‘बिग बॉस 14’ची स्पर्धक निक्की तंबोलीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Good News | आयुष्मान खुरानाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, भाऊ अपारशक्ती होणार ‘बाबा’!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.