‘बिग बॉस 17’च्या मैदानात सोहेल आणि अरबाज, सलमान खान याच्या भावांनी थेट…

बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी दिवसांमध्ये घरात मोठा हंगामा बघायला मिळालाय. सलमान खान या सीजनला देखील होस्ट करताना दिसतोय.

बिग बॉस 17च्या मैदानात सोहेल आणि अरबाज, सलमान खान याच्या भावांनी थेट...
| Updated on: Oct 29, 2023 | 3:28 PM

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा होणार आहे. फक्त सलमान खान हाच नाही तर त्याचे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान हे थेट बिग बॉस 17 ला होस्ट करताना दिसणार आहेत. बिग बॉस 17 मधील घरातील सदस्यांसोबत धमाल करताना अरबाज आणि सोहेल हे दिसतील. मुळात म्हणजे बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 टीआरपीमध्ये टाॅपला ठेवण्यासाठी निर्मात्यांनी देखील कंबर कसलीये.

बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बॉस 17 मध्ये या दोघांमध्ये मोठे वाद सातत्याने बघायला मिळत आहेत. अंकिता लोखंडे ही विकी जैन याला थेट म्हणते की, तू घरातील सर्व सदस्यांना वेळ देतोय फक्त मला नाही. यानंतर अंकिता थेट ढसाढसा रडताना दिसली.

बिग बॉस 17 ला सलमान खान हा होस्ट करतोय. मात्र, मोठा धमाका करण्यासाठी बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी थेट सलमान खान याचे दोन्ही बंधू सोहेल खान आणि अरबाज खान यांना मंचावर आमंत्रित करत थेट होस्ट करण्याची संधी दिली. यावेळी दोघेही धमाकेदार होस्ट करताना दिसत आहेत. घरातील सदस्यांसोबत हे दोघे मस्ती देखील करतात.

ऐश्वर्या शर्मा हिने नील भट्ट याला बांधून ठेवल्याचे देखील सांगताना सोहेल आणि अरबाज दिसत आहेत. आता याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. नुकताच बिग बॉस 17 मध्ये ईशा हिचा खरा चेहरा दाखवण्यात आलाय. बिग बॉस 17 मध्ये थेट ईशाचा करंट बॉयफ्रेंड दाखल झालाय. यामुळे सर्वजण हैराण झाले.

विशेष म्हणजे ईशा हिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल याने मोठे खुलासे केले. इतकेच नाही तर घरात दाखल झाल्यावर लगेचच काही गंभीर आरोप त्याने ईशावर केले. अजूनही बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होणार आहेत. बिग बॉस 17 हिट ठरताना दिसतंय. विकेंडच्या वारला सलमान खान याने घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावलाय.