सोनाक्षी सिन्हाने हेडफोन मागवले, अमेझॉनवरुन लोखंडी नळ आला

मुंबई : ऑनलाईन धोका अनेकांना बसल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. पण आता चक्क बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलंय. सोनाक्षी सिन्हाने अमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले होते. पण तिला कुरिअरने चक्क तुटलेल्या नळाचे तुकडे घरी आणून देण्यात आले. सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आणि अमेझॉनकडे तक्रारही केली. सोनाक्षीने 18 हजार रुपयांचे बोसचे …

सोनाक्षी सिन्हाने हेडफोन मागवले, अमेझॉनवरुन लोखंडी नळ आला

मुंबई : ऑनलाईन धोका अनेकांना बसल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. पण आता चक्क बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन शॉपिंग करणं महागात पडलंय. सोनाक्षी सिन्हाने अमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले होते. पण तिला कुरिअरने चक्क तुटलेल्या नळाचे तुकडे घरी आणून देण्यात आले.

सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आणि अमेझॉनकडे तक्रारही केली. सोनाक्षीने 18 हजार रुपयांचे बोसचे हेडफोन मागवले होते. याबदल्यात तिला लोखंडी नळाचे तुटलेले तुकडे पाठवण्यात आले. तिने यानंतर तक्रारही केली. पण याला अमेझॉनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

विशेष म्हणजे सोनाक्षीने यानंतर आणखी एक ट्वीट करत कुणाला नळाचे तुकडे घ्यायचे का, तेही 18000 रुपयांना, अशीही विचारणा केली आणि अमेझॉनलाही सुनावलं.

 

अमेझॉनच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी सोनाक्षीच्या ट्वीटला रिप्लाय दिला. या चुकीबद्दल अमेझॉन इंडियाने माफी मागितली आणि पुढील मदतीसाठी डिटेल्सचीही मागणी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *