AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवत बेबी बंप लपवला…

रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सोनाक्षी सिन्हाने पती झहीरसोबत हजेरी लावली होती. ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. यावेळी तिचा पती झहीरने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवून तिचा बेबी बंप लपण्याचा प्रयत्न केल्याचं दाखवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवत बेबी बंप लपवला...
Sonakshi Sinha Pregnancy Rumors, Zaheer Iqbal Playful Reaction at Diwali PartyImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2025 | 2:44 PM
Share

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टी आता सुरु झाल्या आहेत. नुकतीच मनीष मल्होत्राच्या घरीही दिवाळी पार्टी झाली. त्यानंतर आता रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते. हृतिक रोशन आणि सबा आझादपासून ते सोनाक्षी-झहीरपर्यंत सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती.

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?

या पार्टीत चर्चा झाली ती बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची. या कार्यक्रमासाठी सोनाक्षी सोनेरी आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या पोशाखात दिसली, ती खूपच सुंदर दिसत होती. पण ती यावेळी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी देखील हेच प्रश्न उपस्थित केले. त्याच अफवांमध्ये आता झहीरने असं काही केलं की सगळे शॉक झाले. सोनाक्षी स्वत: यामुळे गोंधळात पडली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झहीरने सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवत…

सोनाक्षीचा पती आता या अफवांना विनोदी पद्धतीने उत्तर दिले आहे. दोघेही रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला गेले होते, जिथे झहीरने सोनाक्षीच्या पोटाला स्पर्श केला आणि त्याचा बेबी बंप लपवण्याचं नाटक केलं. जेव्हा सोनाक्षीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा ते दोघेही हसले. झहीरने पुन्हा प्रयत्न केला तेव्हा सोनाक्षीने त्याला रोखलं.शेवटी झहीर हसत म्हणाला की या सर्व अफवा आहेत.

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स 

लोक या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, “झहीर खूप मजेदार आहे.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, “त्यांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला.” अजून एकाने लिहिले की “ते खूप गोंडस आणि मजेदार आहेत. ते एकत्र परिपूर्ण आहेत”.

लग्न कधी झालं?

सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 रोजी मुंबईतील बास्टियन येथे लग्न केले, ज्यात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर एक भव्य रिसेप्शन पार पडले. लग्न झाल्यापासून, हे जोडपे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यातील हलकेफुलके आणि भावनिक क्षण शेअर करत असतात.

सोनाक्षीच्या कामाबद्दल

कामाच्या बाबतीत, सोनाक्षी शेवटची “निकिता रॉय” चित्रपटात दिसली होती. ती सध्या “दा-बँग: द टूर रीलोडेड टू कतार” ची तयारी करत आहे. हा भव्य बॉलिवूड कॉन्सर्ट 14 नोव्हेंबर 2025 रोजी दोहा येथील एशियन टाउन अ‍ॅम्फीथिएटर येथे होणार आहे, ज्यामध्ये संगीत, नृत्य आणि स्टार-परफॉर्मन्स असणार आहेत.

महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.