Babu Mohan : मला पानातून विष देऊन…सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा, केली इंडस्ट्रीची पोलखोल

Babu Mohan : टॉलिवूड अभिनेते बाबू मोहन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खबळजनक दावा केला आहे.

Babu Mohan : मला पानातून विष देऊन...सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा, केली इंडस्ट्रीची पोलखोल
| Updated on: Oct 13, 2026 | 8:40 PM

ज्येष्ठ टॉलिवूड अभिनेते बाबू मोहन यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. बाबू मोहन यांनी आंध्र प्रदेशचे कामगार मंत्री म्हणूनही काम केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या पानात विष घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

बाबू मोहन यांचा जन्म तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील बिरोलू येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव पल्ली बाबू मोहन असून, विनोदाचं अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. १९८६ मध्ये अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी ते आंध्र प्रदेशच्या महसूल विभागात सरकारी कर्मचारी होते. आता, एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील एक भयानक घटना सांगितली.

Loading...

बाबू मोहन म्हणाले, ‘मी दिवसाला ३० पेक्षा जास्त पानं खायचो.’ बाबू मोहन यांना एकेकाळी पान खाण्याचं व्यसन होतं. त्यांनी स्वतः सांगितलं की, एके काळी ते दिवसाला ३० हून अधिक पानं खायचे. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलं होतं. बाबू मोहन यांनी सांगितलं की, चित्रपट आणि राजकारणातील त्यांची कारकीर्द जसजशी पुढे जात होती, तसतसे काही विरोधक त्यांचा द्वेष करू लागले. त्यांचा दावा आहे की, त्यांचं वाढते यश सहन न झाल्यानं या लोकांनी त्यांचा जीव घेण्याचा कट रचला. ते म्हणाले, ‘एकदा मला मारण्याचा प्रयत्न झाला होता. माझ्या आवडत्या पानात विष मिसळलं होतं. मी ते खाणारच होतो, पण तेवढ्यात पोलिसांनी फोन करून मला ते न खाण्याची ताकीद दिली. त्या दिवशी माझा जीव वाचला.’

मात्र, या धक्कादायक घटनेमागे कोण होतं हे बाबू मोहन यांनी उघड केलं नाही. ते म्हणाले की, या घटनेनं त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला, ग्लॅमरचं जग केवळ झगमगाटानेच भरलेलं नाही, तर त्यात छुपे धोके आणि शत्रुत्वही आहे. ‘त्या घटनेनंतर मी पान खाण्याची सवय पूर्णपणे सोडून दिली.’ असंही अभिनेत्यानं सांगितलं.

बाबू मोहन यांची राजकीय कारकीर्द

बाबू मोहन हे सुरुवातीपासूनच एन.टी. रामाराव यांचे कट्टर समर्थक होते. यामुळे ते तेलगू देसम पक्षात सामील झाले. त्यांनी १९९८ ची लोकसभा निवडणूक अमलापुरम लोकसभा मतदारसंघातून लढवली, पण त्यांचा पराभव झाला. ते १९९८ च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि १९९९ मध्ये मेडक जिल्ह्यातील आंडोले विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले. या काळात त्यांनी एन. चंद्रबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून काम केले. २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, त्यांनी २०१४ मध्ये तेलगू देसम पक्ष सोडला आणि तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. ते पुन्हा आमदार झाले. नंतर २०१८ मध्ये ते भारतीय जनता पक्षात सामील झाले, परंतु अपमान आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष ही कारणे देत त्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये भाजपचा राजीनामा दिला. दोन वर्षांपूर्वी, २०२४ मध्ये, ते तेलगू देसम पक्षात सामील झाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us