AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानशी लग्न करण्यासाठी कित्येक मुली उत्सुक, तो 3-4 मुलींचा..; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

सोनालीने यावेळी अभिनेता सैफ अली खानचंही कौतुक केलं. सैफने त्याच्या कारकिर्दीत रोमँटिक हिरोपासून गंभीर, वेगळ्या आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखांपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत.

आमिर खानशी लग्न करण्यासाठी कित्येक मुली उत्सुक, तो 3-4 मुलींचा..; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
Aamir Khan and Sonali KulkarniImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2026 | 11:39 AM
Share

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या वयाबरोबर त्यांच्या भूमिकाही बदलतात, असा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. विशेषतः अभिनेत्रींचं लग्न किंवा मातृत्व यानंतर त्यांना आई, पत्नी किंवा इतर वयस्कर व्यक्तिरेखा दिल्या जातात, अशी खंत व्यक्त केली जाते. याच मुद्द्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. तिच्या मते, आता परिस्थितीत हळूहळू बदल होत असून अभिनेत्रींचं लग्न झालं किंवा त्यांना मुलं झाली म्हणून त्यांचं करिअर थांबण्याची गरज नाही. याच संदर्भात तिने आमिर खान आणि सैफ अली खान यांचं उदाहरण देत त्यांच्या बदललेल्या भूमिकांचं कौतुक केलं आहे.

सोनाली कुलकर्णीने अभिनेत्रींचं लवकर ‘टाइपकास्ट’ होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने तिच्या अनुभवाचाही दाखला दिला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटात तिने सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे सोनाली सलमानपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. या भूमिकेबद्दल तिने यापूर्वीही भाष्य केलं होतं. तिच्या मते, एखाद्या कलाकाराला भूमिका आवडत असेल आणि काम करण्याची संधी मिळत असेल, तर अशा संधींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं.

‘लग्न झालं म्हणजे अभिनेत्रीचं करिअर संपत नाही’

सोनालीच्या मते, अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याचा त्यांच्या कामावर परिणाम व्हायला नको. नायिकांचंही लग्न होतं, त्यांना मुलं होतात, कुटुंब असतं आणि तरीही त्या चांगलं काम करू शकतात, हा विचार मनोरंजनसृष्टीत अधिक स्वीकारला जाण्याची गरज आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात लग्न किंवा मातृत्व आलं म्हणून तिला केवळ आईच्या भूमिका देणं योग्य नाही, असा तिच्या बोलण्याचा सूर होता.

“आपल्याकडे अनेक अष्टपैलू अभिनेते आहेत. मला नाही वाटत की कोणताही अभिनेता म्हणेल की त्याला तरुण दिसायचं आहे. जर आपण सैफ अली खानबद्दल बोललो तर तो दिवसेंदिवस अधिकाधिक मॅच्युअर होत आहे. तो प्रेमात पडलेल्या तरुण वडिलांची भूमिका साकारायला घाबरत नाही. आमिर खान म्हणजे प्रयोग करण्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मला नाही वाटत ती ‘दंगल’मध्ये त्याने जे केलं, ते करण्याची हिंमत इतर कोणामध्ये असेल. आमिर खान, ज्याचे पोस्टर सगळीकडे लागतात, मुली त्याच्यासाठी वेड्या होतात, त्याच्याशी लग्न करण्यासाठी जीव देतात. तो कोणत्याही प्रोस्थेटिक्सशिवाय स्वत:ला तीन-चार मुलींचा बाप म्हणून सादर करतो, तर तो माझा हिरो आहे. तो निर्भयपणे स्वत:ला झोकून देत आहे. मला नाही वाटत की कोणताही चांगला अभिनेता तरुण दिसण्याच्या स्पर्धेत अडकला आहे. ते त्यांची प्रतिभा दाखवत आहेत. त्यांना त्यांच्या वयाची भीती वाटत नाही,” असं मत सोनालीने मांडलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन