सोनू निगमने उडवली सलमान खानची खिल्ली ? व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाला
सोनू निगमचा सलमान खानच्या गाण्यावरचा व्हायरल व्हिडिओ वादात सापडला. त्याने सलमानची खिल्ली उडवल्याचा दावा केला जात होता. मात्र सोनूने हे दावे फेटाळून लावत, व्हिडिओ एडिट केल्याचं स्पष्टीकरण दिलं.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचा (Sonu Nigam) एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सोनू निगम हा टीव्हीवर सलमान खानने (Salman Khan) गायलेलं एक गाणं ऐकताना दिसला. इतकं छान गाणं ऐकून खूप काळ लोटला, अशी टिप्पणी त्याने केली केली. मात्र या व्हिडीओतून त्याने अभिनेता सलमान खानची खिल्ली उडवली असा दावा केला जात होता.त्यावर बऱ्याच उलटसुलट कमेंट्सही आल्या. आता खुद्द सोनू निगमनेच या व्हायरल व्हिडीओचं, त्यामागे करण्यात आलेल्या दाव्याचं सत्य सांगत स्पष्टीकरण दिलंय.
काय होतं त्या व्हिडीओमध्ये ?
आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना सोनू निगमने लिहिलं – इंटरनेटवर काहीही घडू शकतं. त्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये सोनू निगम टीव्हीवर एक गाणे ऐकत होता. सलमान खानने गायलेलं ‘मैं हूँ हीरो तेरा’ हे गाणं तेव्हा टीव्हीवर लागलं होतं. ते गाणं ऐकल्यानंतर सोनू निगम म्हणतो, “खूप दिवसांनी काहीतरी छान ऐकायला मिळालं आणि माझं डोकं खराब झालं. मी कोणाला अशा प्रकारे गाताना ऐकलं असतं, तर मी नक्कीच रडलो असतो.”
व्हायरल व्हिडीओबद्दल सोनूचं स्पष्टीकरण
बघता बघता सोनू निगमचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि व्हायरल झाला. त्यावर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या, सोनू निगमने सलमान खानला रोस्ट केलं, त्याची खिल्ली उडवली अस अनेकांचं म्हणणं होतं. मात्र आता या संपर्ण प्रकरणावर सोनू निगमने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप त्याने केला. इंटरनेटवर काहीही होऊ शकतं. हा एडिट केलेला व्हिडीओ मला दिसला. एका पाकिस्तानी मुलीच्या गाण्यावर मी ही रिॲक्शन दिली होती ‘ – असं सांगत सोनू निगमने त्याची बाजू मांडली.
सोशल मीडिया यूजर्सची प्रतिक्रिया काय ?
सोनू निगमच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं, ” सर, हा व्हिडिओ कदाचित एडिट केलेला असू शकतो, पण यात तथ्य आहे.” तर दुसऱ्या वेगळीच कमेंट केली. ” त्याचा (सलमान खान) रोष टाळण्यासाठी सोनू भाई आधीच स्पष्टीकरण देत आहेत.” असं त्याने म्हटलं. ” त्यांची ( सोनू निगम) कारकीर्द धोक्यात आहे, म्हणूनच आधीच स्पष्टीकरण द्यावं लागत आहे” असा टोला आणखी एकाने लगावला. तर आणखी एकाने खूप मजेशीर कमेंट केली. ” इंटरनेटच्या शक्तीचा गैरवापर झालाय.” एकंदरच सोनू निगमच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला.
‘मैं हू हीरो तेरा’ चा वाद
खरंतर, 11 सप्टेंबर रोजी सलमान खानच्या ‘हिरो’ (Hero) या चित्रपटाचा 11 वा वर्धापनदिन होता. या निमित्ताने ‘सलमान खान फिल्म्स’ने (SKF) ‘मैं हूँ हीरो तेरा’ (Main Hoon Hero Tera) या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला. मात्र, या गाण्याचे संगीतकार असूनही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अमाल मलिकचे नाव वगळण्यात आलं होतं. अमालने याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आणि लोकांनी त्याच्या या तक्रारीचा संबंध थेट सलमान खानशी जोडला. परिणामी, अमाल मलिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सलमान खाननेच तुला करिअरमधील मोठी संधी (big break) दिली होती, तरीही तो आता त्याच्याच विरोधात बोलत आहे अशी आठवण लोकांनी त्याला करून दिली. मात्र मी सलमान खानबद्दल नाराजी व्यक्त केली नव्हती, तर ‘सलमान खान फिल्म्स’बाबत प्रश्न उपस्थित केले होते, असं म्हणत अमाल मलिकने सारवासारव केली.