पैशांसाठी 20 वर्षांनी मोठ्या ‘ओव्हरवेट’ निर्मात्याशी केले दुसरे लग्न? अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

दाक्षिणात्या अभिनेत्री महालक्ष्मीने पती रविंदर चंद्रशेखरनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमच्या माध्यमातून तिने लग्नानंतर दोघांना ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. आता ती काय म्हणाली जाणून घ्या...

पैशांसाठी 20 वर्षांनी मोठ्या ‘ओव्हरवेट’ निर्मात्याशी केले दुसरे लग्न? अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
Mahalakshmi
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 9:16 AM

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी शंकरन आणि तिचा निर्माता पती रविंदर चंद्रशेखरन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण महालक्ष्मीने एक रोमँटिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झालीयाबाबत सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महालक्ष्मी ही चर्चेत आली आहे.

महालक्ष्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की सर्वकाही तिरुपतीपासूनच सुरू झाले होते. त्यांचे आयुष्य, त्यांचा प्रवास आणि एक नवीन सुरुवात याच ठिकाणापासून झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या जोडप्याला आता चार वर्षे झाली आहेत. महालक्ष्मीने असेही लिहिले की प्रेमाचा अर्थ हा नाही की दुसरे लोक काय पाहतात, काय म्हणतात किंवा काय कमेंट करतात. खरे प्रेम तर एकमेकांची काळजी घेणे आणि कठीण काळात एकत्र उभे राहणे यात आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दोघे एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांची काळजी घेतात आणि एकमेकांचे रक्षण करतात.

Loading...

चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती लव्ह स्टोरी

महालक्ष्मी आणि रविंदरची भेट ‘Vidiyum Varai Kaathiru’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट रविंदर तयार करत होते आणि महालक्ष्मी त्यात काम करत होती. एकत्र काम करताना दोघे जवळ आले आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रविंदरने एका मुलाखतीत सांगितले होते की लग्नापूर्वी दोघे सुमारे दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अखेर १ सप्टेंबर २०२२ रोजी दोघांनी तिरुपतीत कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

दोघांचेही दुसरे लग्न, महालक्ष्मीला एक मुलगा आहे

या लग्नाची एक खास गोष्ट ही आहे की महालक्ष्मी आणि रविंदर दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. महालक्ष्मीचे पहिले लग्न अनिल कुमारशी झाले होते. दोघांच्या नात्यात फूट पडली आणि २०१९ मध्ये ते वेगळे झाले. पहिल्या लग्नातून महालक्ष्मीला एक मुलगाही आहे. रविंदरच्या पहिल्या लग्नाबद्दल जास्त माहिती सार्वजनिकरित्या समोर आलेली नाही.

वजन आणि लूकमुळे झाली ट्रोल

२०२२ मध्ये दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा सोशल मीडियावर प्रेम आणि शुभेच्छांसोबत खूप ट्रोलही करण्यात आले. महालक्ष्मीच्या सौंदर्यावर आणि रविंदरच्या वजनावर लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट केल्या. काहींनी तर इथपर्यंत आरोप केले की महालक्ष्मीने पैशांसाठी लग्न केले आहे. तसेच असेही म्हटले गेले की रविंदर महालक्ष्मीपेक्षा २० वर्षांनी मोठा आहे. तो ५२ वर्षांचा आहे आणि अभिनेत्री ३२ वर्षांची. मात्र जोडप्याने ही अफवा खोडून काढली आणि सांगितले की दोघांमध्ये फक्त ६ वर्षांचे अंतर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us