AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट, डिप्रेशन, लिव्हरचा आजार.. ‘स्प्लिट्सविला 7’ फेम मराठमोळ्या मयंक पवारचं निधन कशामुळे?

'मिस्टर इंडिया', 'मिस्टर एशिया'चा किताब जिंकलेला, फिटनेस फ्रिक, 'स्प्लिट्सविला 7' फेम मयंक पवारने वयाच्या 37 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

घटस्फोट, डिप्रेशन, लिव्हरचा आजार.. 'स्प्लिट्सविला 7' फेम मराठमोळ्या मयंक पवारचं निधन कशामुळे?
Mayank PawarImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 11:18 AM
Share

‘स्प्लिट्सविला’ या रिअॅलिटी शोच्या सातव्या सिझनमधून प्रकाशझोतात आलेल्या मयंक पवारचं निधन झालं आहे. मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 रोजी त्याने 37 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 23 फेब्रुवारी रोजी मयंकचं निधन झालं आहे. त्याच्या कुटुंबीयांनी शोकसभेची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान संग्राम पार्क इथल्या वाल्मिकी मंदिरात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मयंक फिटनेस फ्रिक असून त्याने सहा वेळा ‘मिस्टर इंडिया’ आणि एकदा ‘मिस्टर एशिया’चा किताब जिंकला होता.

टेलिव्हिजन शोने जरी मयंकला प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी फिटनेसच त्याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं होतं. फिटनेसची प्रचंड आवड असलेला मयंक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरसुद्धा बनला होता. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. पत्नीसोबत घटस्फोटानंतर तो काही महिने नैराश्यात होता. त्यातच त्याला लिव्हरच्या आजाराने ग्रासलं होतं. याचा खुलासा त्याच्या आईनेच केला होता.

‘वन इंडिया’शी बोलताना मयंकच्या आईने सांगितलं, “माझा मुलगा खूप मेहनती होता. फिटनेसच त्याच्यासाठी सर्वस्व होतं. परंतु घटस्फोटामुळे तो आतून खूप खचला होता. त्यातच लिव्हरच्या समस्येमुळे त्याची प्रकृती बिघडली होती. आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु..” मयंकच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे.

‘स्प्लिट्सविला 7’ या शोमुळे मयंकला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या शोमध्ये त्याच्या संयमी स्वभावाचं आणि टास्कदरम्यान केलेल्या दमदार कामगिरीचं इतर स्पर्धकांकडून विशेष कौतुक झालं. नंतर त्या भागात तो या शोमधून बाहेर पडला, तेव्हा अनेकांची निराशा झाली होती. त्यावेळू परीक्षक सनी लिओनीसुद्धा भावूक झाली होती. स्प्लिट्सविलामधून बाहेर पडताना सनी लिओनी आणि निखिल चिनप्पा यांनी त्याला घट्ट मिठी मारली होती.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?