Sunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते....

अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर पोस्ट करत, कंगना रनौतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. (Sunny Leones insta post Kangana Ranaut Urmila Matondkar )

Sunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते....

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्यावर टीका करताना सॉफ्ट पॉर्नस्टार असा उल्लेख केला होता. मात्र टीकेनंतर कंगनाने सारवासारव करताना, अभिनेत्री सनी लिओनीचा दाखला दिला होता. आता याप्रकरणात सनी लिओनीनेही (Sunny Leone) उडी घेतली आहे. (Sunny Leones insta post Kangana Ranaut Urmila Matondkar )

सनी लिओनीने सोशल मीडियावर पोस्ट करत, अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “ज्या लोकांना तुमच्याबद्दल काही माहिती नसते, तेच लोक तुमच्याबद्दल बोलत असतात हे खूपच हास्यासपद आहे”, असं सनी लिओनीने म्हटलं.

कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना सनी लिओनीचाही उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर सनी लिओनीने केलेली पोस्ट महत्त्वाची आहे. सनीने आपल्या पोस्टमध्ये कंगनाचा उल्लेख केला नसला, तरी तिचा रोख नेमका कुणाकडे आहे हे दिसून येतं.

“संपूर्ण जगात सुरु असलेल्या गोष्टींवर लक्ष आहे” असे कॅप्शन सनीने आपल्या एका फोटोपोस्टला दिले आहे. या फोटोमध्ये “ज्या लोकांना तुमच्याबद्दल जास्त माहिती नसते, तेच लोक तुमच्याबद्दल जास्त बोलतात, हे खूपच हास्यासपद आहे” असं सनी म्हणते.

View this post on Instagram

Lunch date! Catching up on world drama!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

महत्वाचे म्हणजे सनी लिओनीने या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र नाव न घेता या पोस्टमधून तिने कंगनावर निशाना साधला असावा अशी चर्चा मनोरंजन विश्वात आहे.

कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. “मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, मुंबई आता पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटायला लागली आहे.” असे विधान केल्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र कंगनाने उर्मिला मातोंडकरचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’असा केला होता.

(Sunny Leones insta post Kangana Ranaut Urmila Matondkar )

संबंधित बातम्या 

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

“पॉर्न स्टार आक्षेपार्ह कसे? सनी लिओनला पाहा” उर्मिला मातोंडकरांवरील टीकेनंतर कंगनाची सारवासारव

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *