“पॉर्न स्टार आक्षेपार्ह कसे? सनी लिओनला पाहा” उर्मिला मातोंडकरांवरील टीकेनंतर कंगनाची सारवासारव

सनी लिओनचे उदाहरण देत कंगनाने पॉर्न स्टार म्हणणे आक्षेपार्ह नसल्याचा दावा केला आहे.

पॉर्न स्टार आक्षेपार्ह कसे? सनी लिओनला पाहा उर्मिला मातोंडकरांवरील टीकेनंतर कंगनाची सारवासारव
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 3:11 PM

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची बोचरी टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीला रामराम करुन बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनचे उदाहरण देत कंगनाने पॉर्न स्टार म्हणणे आक्षेपार्ह नसल्याचा दावा केला आहे. (Kangana Ranaut-Urmila Matondkar row Kangana refers to Sunny Leone argues being porn star is not derogatory)

“सनी लिओनसारख्या व्यक्ती आमच्या रोल मॉडेल नसाव्यात, असे म्हणणाऱ्या नामांकित लेखकावर लिबरल ब्रिगेड सोशल मीडियावरुन तुटून पडली होती. सनीला इंडस्ट्री आणि संपूर्ण भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारले आहे. अचानक बनावट फेमिनिस्ट्सनी (स्त्रीवादी) पॉर्न स्टारला आक्षेपार्ह मानले आहे” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

काय म्हणाली होती कंगना रनौत?

“उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” असं कंगना ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमान केल्याचा दावाही कंगनाने केला होता. (Kangana Ranaut-Urmila Matondkar row Kangana refers to Sunny Leone argues being porn star is not derogatory)

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या होत्या?

“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी त्याआधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

“क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला होता.

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाकडे केली होती. “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असेही त्या म्हणाल्या होत्या.

याआधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्यावरुनही उर्मिला यांनी कंगनाला चांगलंच सुनावलं होतं. “मुंबई लाखो भारतीयांचे पोट भरते आणि त्यांना नाव-प्रसिद्धी देते, केवळ कृतघ्नच तिची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करु शकतात” असे ट्वीट त्यांनी केले होते.

संबंधित बातम्या :

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

जया बच्चन यांनी नीट ऐकले नाही, किंवा त्यांना समजले नाही, राजू श्रीवास्तवांकडून रवी किशनची पाठराखण

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

(Kangana Ranaut-Urmila Matondkar row Kangana refers to Sunny Leone argues being porn star is not derogatory)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.