AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या लेकी आज उच्च शिखरावर, एक एअर होस्टेस, तर दुसरी स्टायलिस्ट आन्…

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आणि त्यांना स्वतःच्या पोटच्या मुलींसारखं सांभाळं. आज त्याच मुली विविध क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं करत आहे. एकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तर दुसरी एअर होस्टेस... तर जाणून घ्या ते सेलिब्रिटी कोण आहेत, ज्यांनी अनाथ मुलींना चांगलं घर आणि भविष्य दिलं....

लोकप्रिय सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या लेकी आज उच्च शिखरावर, एक एअर होस्टेस, तर दुसरी स्टायलिस्ट आन्...
| Updated on: Jul 01, 2026 | 8:01 PM
Share

बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आणि आलिशान आयुष्यामुळे चर्चेत असतात. हेच सेलिब्रिटी पडद्यामागे किती चांगली कामं करतात हे दिसून येत नाही. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आणि त्यांचा स्वतःच्या पोटच्या मुलींप्रमाणे सांभाळ केला. एका प्रसिद्ध अभिनेत्याने कचऱ्याच्या ठिगाऱ्यात पडलेल्या मुलीला स्वतःच नाव दिलं आणि तिला बापाची माया लावली… या यादीमध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यापासून अभिनेत्री सुष्मिता सेन देखील सामिल आहे. आज याच सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्य मुली यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्या आहेत… आज सेलिब्रिटींच्या दत्तक मुलांबद्दल जाणून घेवू…

रेने सेन (Renee Sen) | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने एका गोंडस मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव रेने सेन असं ठेवलं. रेने हिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. 22 वर्षीय रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने 2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘सुट्टाबाजी’ सिनेमात काम केलं आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+हॉटस्टार उपस्थित आहे. रेने सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

मेघना घई (Meghna Ghai) | सुभाष घई यांनी त्यांच्या भावाची मुलगी मेघना हिला दत्तक घेतलं. त्यांनी मेघनाला मीडिया आणि पापाराझींपासून नेहमीच दूर ठेवलं. मेघना घई पुरी या मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा आहेत.

दिशानी चक्रवर्ती (Dishani Chakraborty) | दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मुलगी दिशानी हिला कचऱ्याच्या ठिगाऱ्यातून आणलं होतं. त्यानंतर मिथुन यांनी त्या मुलीला स्वतःचं नाव दिलं. दिशानी हिने न्ययॉर्क येथील फिल्म ऍकडमी मधून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं. दिशानी हिला अभिनयात रस आहे आणि दिशानी हिने दोन शॉर्ट फिल्ममध्ये काम देखील केलं आहे.

छाया टंडन (Chaya Tandon) | अभिनेत्री रवीना टंडन हिने वयाच्या 21 व्या वर्षी छायाला दत्तक घेतलं. रवीनाच्या दत्तक मुलीचं लग्न झालं आहे. पण छाया एक एअर होस्टेस आहे. रवीना हिच्यासोबत छायाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

अर्पिता खान (Arpita Khan) | खान कुटुंबाची लाडकी लेक म्हणजे अर्पिता खान… सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता खान आज अभिनेत्री नसली तरी, प्रचंड प्रसिद्ध आहे. भाईजान याचे वडील सलीन यान यांनी रस्त्यावर रडत असलेल्या अर्पिताला घरी आणलं आणि स्वतःच्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ केला. अर्पिता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ