
मराठी इडस्ट्री असो किंवा हिंदी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन्हीवेळी प्रेक्षकाची मने जिंकली. लक्ष्मीकांत यांनी सर्वांच्याच मनावर राज्य केलं. अगदी बॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांना लोकांकडून खूप प्रेम मिळालं. जरी हा दिग्गज अभिनेता आता आल्यात नसला तरी देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही कमी झालेली नाही. त्यांचे चित्रपट आजही लोक तेवढ्याच आवडीने पाहतात. आता त्यांची दोन्ही मुलं देखील अभिनयात आपलं नशीब आजमावत आहे.
अभिनय बेर्डे चित्रपटांमधून आपलं टॅलेंट प्रेक्षकांना दाखवत आहे
लक्ष्मीकांत यांचा मोठा मुलगा अभिनय बेर्डे हळू हळू चित्रपटांमधून आपलं टॅलेंट प्रेक्षकांना दाखवत आहे. त्याचे बरेच चित्रपट आले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. अभिनयमध्ये अनेकांना लक्ष्मीकांत यांची छबी दिसते. त्यामुळे जेव्हा कधी लोक त्याला पडद्यावर पाहतात किंवा त्याचे फोटो पाहतात तेव्हा आवर्जून त्याच्या वडिलांचा म्हणजे लक्ष्मीकांत यांचा उल्लेख होतो.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे अभिनेत्री आहे अन्…
तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे देखील अभिनयानं आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वानंदी एक अभिनेत्री आहे आणि तिने काही मराठी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे . स्वानंदी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमी शेअर करत असते. प्रेक्षकांना तिच्याविषयी जाणून घ्यायला देखील खूप आवडतं. विशेष म्हणजे ती नेमकं काय करते? याबाबतही अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
स्वानंदीचे वय काय?
भाऊ अभिनयनंतर स्वानंदी बेर्डेनेही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे तिचा 2024 साली ‘मन येड्यागत झालं’ हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. स्वानंदी देखील वडिलांच्या आणि भावाच्या पवलांवर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आली आहे. दरम्यान ती आता 25 वर्षांची झाली असून तिने याबाबत तिच्या सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. स्वानंदीने एक फोटोशूट केलं आहे त्याला तिने ’25’ असं कॅप्शन दिलं आहे. या आनंदात तिने हे फोटोशूट केल्याचंही तिने म्हटलं आहे. या फोटोशूटवेळी तिने घातलेला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर आमि ग्लॅमरस दिसत आहे.
स्वानंदी आणि अभिनयचे बरंच चांगलं काम येणाऱ्या पुढच्या काळात प्रेक्षकांना नक्कीच पाहायाल मिळणार आहे. कारण दोघेही अभिनयात आपली कला दाखवण्याचा प्रयत्न कराताना दिसत आहेत.