AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या निधनानंतर ‘दयाबेन’ची झाली अशी अवस्था; पूर्णपणे खचला भाऊ

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी हिच्या वडिलांचं मंगळवारी निधन झालं. दिशाचे वडील भीम वकानी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

वडिलांच्या निधनानंतर 'दयाबेन'ची झाली अशी अवस्था; पूर्णपणे खचला भाऊ
Disha Vakani and Mayur VakaniImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 08, 2026 | 3:31 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशाचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर 7 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दिशा आणि तिच्या कुटुंबीयांसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. तिचा भाऊ आणि अभिनेता मयूर वकानीसुद्धा पूर्णपणे खचला आहे. सोशल मीडियावर भीम वकानी यांच्या अंत्यविधीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या कठीण काळात वकानी कुटुंबीय एकमेकांना सावरताना आणि धीर देताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये दिशाचा भाऊ मयूरचे डोळे पाणावल्याचं स्पष्ट पहायला मिळतंय. वडिलांना गमावल्यानंतर मयूर अतीव दु:ख झालं असून त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. दिशानेही तिच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. आणखी एका व्हिडीओमध्ये भीम वकानी यांचं पार्थिवर स्मशानभूमीकडे नेताना मयूरला दु:ख अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. यावेळी दिशाने दुप्पट्याने तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दिशाचे वडील भीम वकानी हे गुजराती थिएटर आर्टिस्ट होते. त्यांनी आमिर खानच्या ‘लगान’, शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ आणि माधुरी दीक्षितच्या ‘लज्जा’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते दिशाच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या एका खास एपिसोडमध्येही झळकले होते. भीम वकानी यांनी हिंदीसोबतच गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. दिशाला तिच्या वडिलांमुळेच अभिनयात संधी मिळाली होती. तिने वडिलांसोबत बालकलाकार म्हणून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती.

दिशा वकानीला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. तिने काही वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर ती परतलीच नाही. दिशा तिच्या कौटुंबिक आयुष्याकडे अधिक लक्ष केंद्रीत आहे. मालिकेत काम करत नसली तरी निर्माते असितकुमार मोदी यांच्यासोबत तिचं बहिण-भावाचं नातं आहे. रक्षाबंधनला ती आवर्जून राखी बांधायला त्यांच्याकडे जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...