AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोडीही लाज नाही..; ‘तारक मेहता..’च्या ‘सोनू’वर का भडकले नेटकरी? आईवरही चाहते नाराज

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

थोडीही लाज नाही..; 'तारक मेहता..'च्या 'सोनू'वर का भडकले नेटकरी? आईवरही चाहते नाराज
निधी भानुशालीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2025 | 10:39 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एक अशी मालिका आहे, ज्याचा आनंद संपूर्ण परिवार एकत्र बसून घेऊ शकतो. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये बरेच असे कलाकार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी लहानाचं मोठं होताना पाहिलंय. यामध्ये भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री निधी भानुशालीचाही समावेश आहे. निधीने बालकलाकार म्हणून या मालिकेत काम केलं होतं आणि सोनूच्या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ती या मालिकेचा भाग नाही. परंतु सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंवर तिचे काही चाहते नाराज झाले आहेत.

निधी सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. निधी तिच्या आईवडिलांसोबत गोव्याला फिरायला गेली होती. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या आईवडिलांसोबत आणि भावासोबत एंजॉय करताना दिसून येत आहे. यातील काही फोटोंमध्ये ती बिकिनी घालून स्विमिंग पूलजवळ पोझ देताना दिसतेय. निधीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकीकडे निधीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आवडत असून दुसरीकडे काही युजर्सनी तिला ट्रोल केलंय. एका फोटोमध्ये निधीसोबत तिच्या आईनेही मोनॉकिनी परिधान केल्याचं पहायला मिळतंय. त्यावरूनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर आईवडिलांसमोर असे तोकडे कपडे घातल्याने निधीवरही काहींनी निशाणा साधला आहे.

‘आईलाही लाज वाटत नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आई-वडील आणि भावासमोर कसे कपडे घातले आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘संपूर्ण कुटुंबच अजब आहे’, असंही काहींनी लिहिलं आहे. निधीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे असे अनेक बोल्ट फोटो पहायला मिळतात. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

निधीचं स्वत:चं युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर ती तिच्या ट्रिप्सचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 2019 मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...