AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते प्रेम नव्हतं, तर फक्त गरज..; बिग बॉसच्या घरातील अफेअरबद्दल काजोलची बहीण स्पष्टच बोलली..

बिग बॉसच्या घरात अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांची जोडी चांगलीच चर्चेत होती. मात्र घराबाहेर पडल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा ब्रेकअप झाला. आता नुकत्याच एका मुलाखतीत तनिषा या नात्याबद्दल व्यक्त झाली.

ते प्रेम नव्हतं, तर फक्त गरज..; बिग बॉसच्या घरातील अफेअरबद्दल काजोलची बहीण स्पष्टच बोलली..
तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहलीImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2026 | 2:31 PM
Share

अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अभिनेता अरमान कोहली यांचं नातं एकेकाळी प्रचंड चर्चेत होतं. ‘बिग बॉस 7’ या रिअॅलिटी शोमध्ये दोघांमधील जवळीक वाढली होती. शोमधील त्यांची केमिस्ट्री, एकमेकांना दिलेली साथ आणि प्रेमाच्या चर्चा यामुळे ते सतत चर्चेत राहिले. मात्र, आता अनेक वर्षांनंतर तनिषाने या नात्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. अरमानसोबतचं नातं हे प्रेमापेक्षा ‘ट्रॉमा बॉन्डिंग’शी संबंधित होतं, असं तिने म्हटलं आहे. तसंच, ‘बिग बॉस’च्या अनुभवातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याचा मानसिक परिणाम समजून घेण्यासाठी तिला सहा महिने लागल्याचंही तिने सांगितलं.

तनिषाने अलीकडील पॉडकास्टमधील संवादात ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभवांबद्दल भाष्य केलं. शोमध्ये सहभागी होताना तिला तिथल्या वातावरणाची आणि त्याचा मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांची पुरेशी कल्पना नव्हती, असं तिने सांगितलं. तिच्या मते, रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांना अनेकदा तणावपूर्ण परिस्थितींना सामोरं जावं लागतं. अशा वेळी एकत्र अडचणींचा सामना करताना दोन व्यक्तींमध्ये भावनिक जवळीक निर्माण होऊ शकते. शोमध्ये तिला अरमानसोबत वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळाल्या. दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्यामुळे त्याच्यासोबत तिला एक प्रकारचा परिचयाचा आणि आपलेपणाचा अनुभव येत होता. घरातील इतर स्पर्धकांशी मतभेद किंवा एकटेपणा जाणवत असताना अरमान तिच्या बाजूने असल्याचं तिला वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. मात्र, आता मागे वळून पाहताना त्या भावनांवर शोमधील परिस्थितीचा मोठा प्रभाव होता, असं तनिषाने म्हटलं आहे.

तनिषाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांवर स्पर्धकांना विशिष्ट परिस्थितीत ठेवून त्यांच्या भावनांवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला आहे. स्पर्धकांना एकाच गटात ठेवणं किंवा कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांच्या जवळ आणणं यामुळे त्यांच्यात भावनिक बंध निर्माण होऊ शकतात, असं मत तिने मांडलं आहे.

शोमधून बाहेर आल्यानंतर या अनुभवाचा तिच्यावर झालेला परिणाम समजून घेण्यासाठी तिला वेळ लागला. इतकंच नव्हे तर या मानसिक अनुभवातून सावरण्यासाठी तिला मानसोपचारतज्ज्ञांची मदतही घ्यावी लागली. ‘बिग बॉस’मधील परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भावनिक गुंतवणुकीतून बाहेर पडण्यासाठी सुमारे सहा महिने लागल्याचं तिने म्हटलं आहे.

तणावपूर्ण किंवा भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत एकत्र राहिल्यामुळे दोन व्यक्तींमध्ये तीव्र भावनिक जवळीक निर्माण होऊ शकते. अशा जवळिकीला तनिषाने ‘ट्रॉमा बॉन्डिंग’ असं संबोधलं आहे. ‘बिग बॉस 7’दरम्यान चर्चेत आलेल्या तनिषा आणि अरमानच्या नात्याची शो संपल्यानंतरही चर्चा सुरू होती. मात्र, 2014 मध्ये दोघांचं नातं संपल्याचं वृत्त समोर आलं.

Follow Us
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध