AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, बहुचर्चित KGF 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!

केजीएफ (KGF) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ 2 बद्दल एक अपडेट आहे.

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, बहुचर्चित KGF 2 चित्रपटाचा टीझर 'या' दिवशी होणार प्रदर्शित!
| Updated on: Dec 21, 2020 | 2:35 PM
Share

मुंबई : केजीएफ (KGF) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ 2 बद्दल एक अपडेट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी केजीएफ 2 चे नवीन पोस्टर शेअर करत, टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटाचा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही बातमी आल्यापासून केजीएफचे चाहते खूप उत्साही झाले आहेत. पोस्टरमध्ये तुम्हाला दिसेल की यश खुर्चीवर बसलेला आहे आणि तो खूप रागाने बघत आहे. (Teaser of KGF 2 movie will be screened)

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले होते की, ‘8 जानेवारीला सकाळी 10.18 वाजता साम्राज्याची झलक पहा. यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु आम्ही आणखी स्ट्रॉन्ग होऊ आला आहोत ‘

यापूर्वी यशने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते की, ‘साम्राज्याला पुन्हा तयार करताना’

यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात संजय खलनायक अधीरा आणि रवीना नेते रामिका सेनच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल.

चाहत्यांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्याच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ‘असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगलेच सहज झाले होते. दोघांनीही शूटींग एन्जॉय केलं. दरम्यान,  8 जानेवारीचा दिवस खूप खास आहे कारण हा अभिनेता यशचा वाढदिवसही आहे.

संबंधित बातम्या : 

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2020 मध्ये ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’ वेब सीरीज सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी ठरले!

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

(Teaser of KGF 2 movie will be screened)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.