AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार, राखी सावंतचे बिनधास्त बोल

बिग बॉसच्या घरात राखी सावंतने पोट मोठं असलं तर रोमान्स करायला अडचणी येतात, असा दावा केलाय (Rakhi sawant body shames Rahul Mahajan).

पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार, राखी सावंतचे बिनधास्त बोल
| Updated on: Feb 18, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : प्रत्येकजण हल्ली फिट राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीदेखीस सध्याचं वातावरण बघता म्हणजे लॉकडाऊन काळात अनेकजण घरातून वर्क फ्रॉम होम करत असल्याने अनेकांचं पोट पुढे आलं आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत बसल्याने शरीर फुगतं. भविष्यात व्यायम करुन आपलं शरीर फिट करता येईलच. मात्र, बिग बॉसच्या घरात राखी सावंतने पोट मोठं असलं तर रोमान्स करायला अडचणी येतात, असा दावा केलाय (Rakhi sawant body shames Rahul Mahajan).

बिग बॉस सीझन 14 आता लवकरच संपणार आहे. या सीझनचा विजेता कोण असेल? हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सध्या बिग बॉसच्या घरात फक्त पाच स्पर्धक आहेत. यामध्ये राखी सावंत, रुबीना दिलैक, अली गोनी, निक्की तंबोली, राहुल वैद्य यांचा समावेश आहे. सध्या बिग बॉसच्या घरात एकदम कूल वातावरण आहे. पाचही स्पर्धक एकमेकांशी गप्पा-गोष्टी करत आहेत. त्यामुळे अतिशय हलकं-फुलकं वातावरण आहे.

यादरम्यान राहुल वैद्यने राखीला राहुल महाजनचं धोतर खेचण्याबाबत विचारल्याचं बघायला मिळालं. त्या प्रश्नावर राखीने राहुल महाजनची बॉडी शेमिंग म्हणजेच त्याच्या शरीरयष्टीवर टीका केली (Rakhi sawant body shames Rahul Mahajan).

“मला राहुल महाजनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण त्याचं पोट मला आवडत नाही. राहुल महाजनकडे अभिनाव सारखे अॅप्स नाहीत”, असं राखी म्हणाली. तिच्या या वक्तव्यावर राहुलने विचारलं, “जर कुणाला अॅप्स नाहीत तर त्याला जगण्याचा अधिकार नाही?”. यावर तिने “कोणतीही महिला मोठं पोट असलेल्या माणसासोबत रोमान्स करु शकत नाही”, असं उत्तर दिलं.

स्पर्धकांची अंडर गारमेंट्स धुण्यात शांती मिळते : राखी

दरम्यान, राखी सावंतने बिग बॉस सीझन 1 मधील आपल्या आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितलं की, पहिल्या सीजनमध्ये ती घरात काहीच काम करायची नाही. फक्त स्पर्धकांचे अंडर गारमेंट्स धुवायची. याशिवाय हे काम करण्यात काहीच गैर नाही, असंदेखील ती म्हणाली. तिला ते काम पसंत आहे आणि आवडतं करायला. स्पर्धकांची अंडर गारमेंट्स धुतल्यानंतर मनाला शांती मिळते, असंदेखील तिने यावेळी राहुल वैद्य आणि निक्कीला सांगितलं.

हेही वाचा : सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.