Video | गोड गळ्याच्या आईला बोबड्या बोलांची साथ, प्रियंका बर्वेने शेअर केला लेकाचा क्युट व्हिडीओ!

गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने आपल्या चिमुकल्या मुलासोबत गाणे गातानाचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Video | गोड गळ्याच्या आईला बोबड्या बोलांची साथ, प्रियंका बर्वेने शेअर केला लेकाचा क्युट व्हिडीओ!
प्रियंका बर्वे आणि युवान

मुंबई : प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे (Priyanka Barve) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती सतत व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने आपल्या चिमुकल्या मुलासोबत गाणे गातानाचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, अनेकजण त्यावर छान छान प्रतिक्रिया देत आहे (Singer Priyanka barve shares cute singing video with little son yuvan).

प्रियंका बर्वेने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रियंकाने त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, तिने आता शेअर केलेला हा व्हिडीओ अतिशय खास असून, या व्हिडीओत प्रियंका तिच्या बाळासोबत गाताना दिसते आहे. प्रियंका गाणे गाते, तसे तिचा चिमुकला लेकही त्याच्याच भाषेत काहीतरी बोलताना दिसतोय. तिने काही ओळी गायल्यानंतर, तो देखील तिच्या मागे गुणगुण्याचा प्रयत्न करतो. ‘वर्क इन प्रोग्रेस’, असे कॅप्शन देत प्रियंकाने हा क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve)

चिमुकल्या युवानच्याच्या ‘या’ बोबड्या बोलांनी सगळेच नेटकरी खुश झाले आहेत. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणत अनेकांनी चिमुकल्या युवानचे कौतुक देखील केले आहे. अवघ्या काही महिन्यांच्या युवानला देखील आई प्रियंका प्रमाणे संगीताची आवड आहे, असे देखील म्हटले जात आहे.

‘युवान’च्या जन्माची गोड बातमी!

गायिका प्रियंका बर्वे आणि तिचा पती सारंग कुलकर्णी यांनी 20 ऑगस्ट रोजी ‘युवान’च्या जन्माची अर्थता ‘आई-बाबा’ झाल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. त्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी त्यांच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नंतर प्रियंकाने युवानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते (Singer Priyanka barve shares cute singing video with little son yuvan).

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve)

मराठीतली आघाडीची गायिका!

प्रियंका बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची गायिका आहे. ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने प्रियंका घराघरांत पोहोचली. ‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी तिला ‘राज्य पुरस्कार’ देखील मिळाला आहे. ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटामधील ‘वाटा वाटा वाटा गं’ हे तिचे गाणेसुद्धा चांगलेच लोकप्रिय झाले. त्याआधी ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केले आहे. त्यासोबतच ‘मला सासू हवी’ आणि ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांची शीर्षकगीतेही प्रियांकाने गायली आहेत.

नाटकामधील ‘अनारकली’

‘मुघल-ए-आझम’ या भव्यदिव्य संगीतनाटकात प्रियंका बर्वेने ‘अनारकली’ची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे बॉलिवूड स्टार्सकडूनही भरभरुन कौतुक झाले होते. नृत्य, अभिनय आणि गायन अशा तिन्ही कला सादर करण्याची संधी तिला या नाटकात मिळाली होती.

(Singer Priyanka barve shares cute singing video with little son yuvan)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI