AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावरची ‘ही’ चिमुकली इतकी प्रेमळ की जीव ओवाळून टाकावा, जाणून घ्या मुलगी आहे तरी कोण?

सोशल मीडियावर सध्या समायरा थापा (samaira thapa) नावाच्या चिमुकलीनो लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावरची 'ही' चिमुकली इतकी प्रेमळ की जीव ओवाळून टाकावा, जाणून घ्या मुलगी आहे तरी कोण?
समायरा थापा
| Updated on: Dec 20, 2020 | 10:18 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या समायरा थापा (samaira thapa) नावाच्या चिमुकलीनो लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. तुम्ही समायराचं नृत्यू, लिपसिंग आणि हावभाव बघितले तर ती या जगातील आठवं आश्चर्य आहे की काय, असं वाटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. समायराचे व्हिडीओ बघितल्यावर ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आम्ही तुम्हाला तिच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत (cute dance and expressions of samaira thapa)

लहान मुलं कुणाला आवडत नाहीत! अनेक लोकांचे फोन आणि लॅपटॉपची मेमरी फक्त लहान मुलांच्या फोटो आणि व्हिडीओजने भरलेले असतात. सोशल मीडियावर तर लहान मुलांचे लाखो फोटो आणि व्हिडीओ असतात. त्यात समायराचा क्यूट अंदाज लाखो लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणत आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अडीच वर्षांची ही चिमुकली कोणत्याही गाण्यावर खूप सुंदर आणि जबरदस्त डान्स करते (cute dance and expressions of samaira thapa)

समायराचा सोशल मीडियावर नुकताच ‘इश्क क्या चीज है या गाण्यावरचा डान्स दिसला. हा व्हिडीओ अवघ्या थोड्या वेळात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लोकांना तिचे प्रत्येक व्हिडीओ प्रचंड आवडतात. जुन्या गाण्यांपासून ते हल्लीच्या नव्या गाण्यांवर समायरा डान्स कराताना दिसते. डान्ससोबत तिचे हावभाव बघताना लोक मंत्रमुग्ध होतात. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात सर्व गाणे तिच्या तोंडपाठ आहेत. समायरा थापाचे फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हिडीओ व्हायरल होतात.

समायरा थापा मुळची नेपाळची

समायरा थापा ही चिमुकली मुळची नेपाळची आहे. तिचा जन्म फेब्रुवारी 2018 मध्ये काठमांडू शहरात झाला. ती सध्या आपल्या आई-वडिलांसह काठमांडू शहरात वास्तवास आहे. तिच्या आईचं नाव सबिना थापा तर वडिलांचं नाव राम थापा असं आहे. ती हिंदू धर्मीय आहे. त्याचबरोबर समयारा नेपाळची नागरिक आहे.

खरंतर समायरा टिकटॉकवर प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींनी तिचं नृत्य, अभिनय आणि हावभावांचं कौतुक केलं. तिला टिकटॉकवर लाखो फोलोअर्स आहेत. याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरही तिचे लाखो चाहते झाले आहेत.

हेही वाचा : Photo : अभिनेत्री अमृता खानविलकरचा खास अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.