नितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत? वाचा ते काय म्हणाले…

सरकारी गाड्यांची अवस्था कशी असते, यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे (Nitin Gadkari on Government cars). 

नितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत? वाचा ते काय म्हणाले...


औरंगाबाद : प्रत्येक मंत्र्यांला सरकारकडून कार दिली जाते. मंत्र्यांना राज्य किंवा देशभर दौरा करावा लागतो. त्यामुळे सरकारकडून मंत्र्यांसाठी गाडीची सुविधा केलेली असते. मात्र, सरकारी गाड्यांची अवस्था कशी असते, यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. औरंगाबादमध्ये जवाहरलाल नेहरु इंजेनिअरिंग कॉलेजच्या इंजनिअरिंग एक्सलंज सेंटरचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवा चांगले आणि वेगवेगळे प्रयोग करण्याचं आवाहन केलं.(Nitin Gadkari on Government cars).

“माझा अपघात झाल्यापासून मी सरकारी गाडीत बसत नाही. मी त्या सरकारी गाडीत बसून आयुष्याची रिस्क घ्यायला तयार नाही. मागे मी मरता मरता वाचलो. सरकारच्या सर्व गाड्या असुरक्षित आहेत. मी एकदा अ‍ॅम्बेसेडर गाडी बनवणारे बिरलाजी यांना प्रश्न विचारला होता की, हॉर्न सोडून गाडीतल सगळेच पार्ट वाजतात का?”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“कृषी, ग्रामीण क्षेत्रात चांगलं तंत्रज्ञान यायला हवं. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्रामीण, वनवासी क्षेत्राला समृद्ध करायचं आहे. गाव, गरीब, मजूर, शेतकऱ्यांचं कल्याण करणं आणि गावं समृद्ध तसेच संपन्न करणं, जेणेकरुन पुन्हा एकदा मुंबई-पुण्याहून सगळी मुलं आपल्या गावी परततील, असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मला विश्वास आहे की, हे होऊ शकतं. हे कुठे केलं पाहिजे याबाबत अभ्यास करुन याचं व्हिजन ठरवता येईल”, असं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी आणखी काय म्हणाले?

कृषी, ग्रामीण क्षेत्रात चांगलं तंत्रज्ञान यायला हवं. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्रामीण, वनवासी क्षेत्राला समृद्ध करायचं आहे. गाव, गरीब, मजूर, शेतकऱ्यांचं कल्याण करणं आणि गावं समृद्ध तसेच संपन्न करणं, जेणेकरुन पुन्हा एकदा मुंबई-पुण्याहून सगळी मुलं आपल्या गावी परततील, असं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मला विश्वास आहे की, हे होऊ शकतं. हे कुठे केलं पाहिजे याबाबत अभ्यास करुन याचं व्हिजन ठरवता येईल.

तुम्ही जे करतात ते महत्त्वाचं आहे. आपल्या देशात आज ऑटोमोबाईल इंडस्ट्री साडेचार लाख कोटी रुपयाची आहे. मी त्याचाच मंत्री आहे. यातील 1 लाख 45 हजार कोटीचा एक्सपोर्ट होतो. भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारं हे क्षेत्र आहे. याशिवाय भारत हे सध्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं हब आहे. मला पाच वर्षाच्या आत भारताला एक नंबरचं ऑटोमोबाईल हब बनवायचं आहे. हे बनवायचं असेल तर तुम्ही जे रिसर्च करत आहात ते भयंकर आवश्यक आहे. तेच खरं भविष्य आहे.

मला आनंद आही की, आज आपल्याकडे इलेक्ट्रिक बस, कार, स्कूटर, बाईक वाढत आहेत. दोन वर्षाच्या आत तुम्ही हे सगळं वापराल. मर्सिडीज बेन्झचे एमडी मला आठ दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला आहे. नंतर जेसीबी लाँच केला. तो बायो सीएनजीवर चालणारा आहे, जो माझा प्रिय विषय आहे. मी TVS आणि बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरही लाँच केल्या आहेत.

मी एक इलेक्ट्रिक SUV लाँच केली. ती गाडी मला आवडली म्हणून मी एक गाडी घरी आणली. एमजी हेक्टर म्हणून कंपनीचं नाव आहे. गाडी दिल्लीत लाँच केल्यानंतर बुक केली आणि घरी आणली. मुलगा आणि सूनेला आपल्याकडे इलेक्ट्रिक कार आहे. तुम्हीही वापरा, असं सांगितलं.

माझा अपघात झाल्यापासून मी सरकारी गाडीत बसत नाही. मी सरकारी गाडीमागे माझ्या आयुष्याची रिस्क घेणार नाही. कारण मी एकदा मरतामरता वाचलो. सरकारच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या सर्व असुरक्षित आहेत.