AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kon Honaar Crorepati: वडाळ्याच्या अक्षय कदमचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे काही धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या आठवड्यात सोमवारच्या भागात असेच एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. वडाळा (Wadala) येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम (Akshay Kadam) सहभागी होणार आहेत.

Kon Honaar Crorepati: वडाळ्याच्या अक्षय कदमचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
वडाळा (Wadala) येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम (Akshay Kadam) सहभागी होणार आहेत. Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 1:13 PM
Share

‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतात. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील. अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अधिक रंगतदार होतो. कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे काही धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या आठवड्यात सोमवारच्या भागात असेच एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. वडाळा (Wadala) येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम (Akshay Kadam) सहभागी होणार आहेत. मध्यमवर्गीय घरातले अक्षय कदम घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी झाले आहेत.

आईवडिलांनी केलेल्या कष्टांची जाणीव असणारे संवेदनशील स्पर्धक अक्षय कदम हे सध्या कंटेट रायटर म्हणून काम करत आहे. आई-वडील आणि एक बहीण असा त्याचा परिवार आहे. अक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होते पण कोरोना महामारीमुळे त्यांचं काम बंद झालं. अक्षय यांची बहीण नायर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन (dialysis technician) म्हणून काम करते. शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिमच्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. अक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडून द्यायला संगितलं होतं पण आईने कामाच्या सवयीमुळे अजून घरकाम सोडलेलं नाही.

पहा व्हिडीओ-

आईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे. अक्षयचं हे स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरु करायची आहे. ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याचं अजून एक स्वप्न आहे की त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरु करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहे. मध्यमवर्गीय अक्षय 25 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असून अक्षयचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा