AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मालिकेतील अमृता पवारने गुपचूप उरकला साखरपुडा

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. कलाविश्वातील मंडळी या लग्नाबाबत उत्सुक असतानाच आता एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ही अभिनेत्री आहे, झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अमृता पवार (Amruta Pawar).

'तुझ्या माझ्या संसाराला..' मालिकेतील अमृता पवारने गुपचूप उरकला साखरपुडा
Actress Amruta PawarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2022 | 8:59 AM
Share

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. कलाविश्वातील मंडळी या लग्नाबाबत उत्सुक असतानाच आता एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ही अभिनेत्री आहे, झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अमृता पवार (Amruta Pawar). 4 एप्रिल रोजी अमृताने नील पाटीलशी साखरपुडा केला. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अद्याप तिच्या साखरपुड्याचा (Engagement) फोटो पोस्ट केला नाही. मात्र तिच्या सहकाऱ्यांनी फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हेच फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावरही अमृता तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी कधी व्यक्त झाली नाही. त्यामुळे अचानक तिच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला.

साखरपुड्यात अमृताने वॉयलेट रंगाची साडी तर नीलने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. अमृता आणि नीलवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मालिकाविश्वातील इतरही कलाकारांनी अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताचा होणारा पती नील हा बायोमेडिकल इंजीनिअर आहे. त्याला फिरण्याचीही खूप आवड आहे. साखरपुड्यापर्यंत नील किंवा अमृताने त्यांच्या नात्याविषयी कमालिची गुप्तता पाळली होती.

अमृताची इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

अमृता सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला..’ या मालिकेत अदितीची भूमिका साकारतेय. यामध्ये तिच्यासोबत हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे. अमृताने याआधी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. ‘दुहेरी’ या मालिकेतून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

हेही वाचा:

Rashmika Mandanna: आलिशान घर, महागड्या गाड्या.. अवघ्या 25व्या वर्षी रश्मिकाने कमावली इतकी संपत्ती

आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.