AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Pilgaonkar : आई-मुलीच्या नात्यावर अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरांचं भाष्य, म्हणाल्या ‘आईसाठी मुलं नेहमीच जीवाभावाची असतात…’

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, श्रिया तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते.(Veteran actress Supriya Pilgaonkar's opinion on the relationship between mother and daughter, said 'Children are always dear to the mother ')

Supriya Pilgaonkar : आई-मुलीच्या नात्यावर अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरांचं भाष्य, म्हणाल्या 'आईसाठी मुलं नेहमीच जीवाभावाची असतात...'
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 6:55 PM
Share

मुंबई : असं म्हणतात की, आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असतं. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक आई, जी आपल्या परिचयाची आहे. ती म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar). जी प्रत्यक्षात एका मुलीची आणि पडद्यावर एका मुलाची आई आहे.

श्रिया पिळगावकर बद्दल बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या…

याबद्दल पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.”

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी (Kuch Rang Pyaar ke Aise bhi) – नई कहानी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ईश्वरीमध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते.. याबद्दल सुप्रियाने आपले मत मांडलं आहे. सुप्रिया पिळगांवकर म्हणजे ईश्वरी म्हणते, “एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.”

कथानकात आत्ता एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे आणि संपूर्ण दीक्षित कुटुंबाला त्यामुळे हादरा बसला आहे. एक कुटुंब म्हणून त्यांच्यात काय घडते हे काळच सांगू शकेल. बघा कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी, सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

संबंधित बातम्या

पुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!  

Himachal Pradesh Trip : मिताली मयेकरची जुईली आणि नचिकेतबरोबर हिमाचल सफर, पाहा सुंदर फोटो

Shilpa Shetty Raj Kundra Wedding: शाही विवाहामुळे शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा आले होते चर्चेत, पाहा खास फोटो

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.