AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द 50’ शोच्या पहिल्याच एपिसोडने खळबळ, 5 कलाकार… कुठे पहायला मिळणार हा रिअॅलिटी शो? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून 'द 50' हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. या शोचे ज्या प्रकारे प्रमोशन करण्यात आले ते पाहून अनेकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली. काल सुरु झालेला हा शो कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या...

'द 50' शोच्या पहिल्याच एपिसोडने खळबळ, 5 कलाकार... कुठे पहायला मिळणार हा रिअॅलिटी शो? वाचा सविस्तर
the 50Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 02, 2026 | 2:06 PM
Share

नवीन रिअॅलिटी शो ‘द 50’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा शो रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी सुरु झाला आहे. पहिल्या एपिसोडनेच प्रेक्षकांना जबरदस्त रोमांच आणि उत्साहाने भरून टाकले. ५० स्पर्धकांसह सुरू झालेल्या या अनोख्या फॉरमॅटच्या शोमध्ये पहिल्याच दिवशी कडक स्पर्धा पाहायला मिळाली, जिथे रणनीती, शारीरिक ताकद आणि टीमवर्कची खरी परीक्षा झाली. आता हा सध्या चर्चेत असणारा शो नेमका कुठे पाहायचा? जाणून घ्या…

‘द 50’ शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये १० स्पर्धकांना कॅप्टन म्हणून निवडले गेले. रजत दलाल, मिस्टर फैजू, प्रिंस नरुला, मोनालिसा, रिद्धी डोगरा, शिव ठाकरे, निक्की तंबोळी, कृष्णा श्रॉफ, करण पटेल आणि उर्वशी ढोलकिया हे कॅप्टन झाले. प्रत्येक कॅप्टनला स्वतःची टीम निवडण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकाने ५-५ सदस्यांची टीम तयार केली. नंतर टीमला रेड आणि ब्लू कार्ड देण्यात आले. ब्लू कार्ड असलेल्या टीमला विशेष पॉवर मिळाली, ज्यामुळे ते आपल्या पसंतीची विरोधी टीम निवडू शकतात.

पहिल्याच दिवशी कांटे की टक्कर

पहिल्याच दिवशी अनेक हाय-व्होल्टेज ड्रामे पाहायला मिळाले. रजत दलालच्या टीमचा सामना मिस्टर फैजूच्या टीमशी झाला, तर प्रिंस नरुला आणि मोनालिसा यांच्या टीम्स आमने-सामने आल्या. शिव ठाकरे यांनी रिद्धी डोगरा यांच्या टीमला आव्हान दिले, तर निक्की तंबोळी आणि कृष्णा श्रॉफ यांच्यात जबरदस्त लढत झाली. याशिवाय करण पटेल आणि उर्वशी ढोलकिया यांच्या टीम्सही एकमेकांशी भिडल्या, ज्यामुळे शोमध्ये प्रचंड ड्रामा आणि उत्साह निर्माण झाला.

हिमेश रेशमिया यांनी दिले सरप्राइज

शोमध्ये ग्लॅमर आणि सरप्राइजचा तडका लावण्यासाठी म्युझिक आयकॉन हिमेश रेशमिया आले. त्यांच्या एंट्रीने संपूर्ण माहौल आणखी खास बनवला. हिमेश यांनी मंचावर गाणे सादर केले आणि जसा जसा परफॉर्मन्स संपला, तसेच स्पर्धेला सुरुवात झाली. या ट्विस्टने शोला आणखी मनोरंजक बनवले.

पहिल्या दिवशी बाहेर पडला हा स्पर्धक

टास्क पूर्ण झाल्यानंतर पाच टीम्स विजयी ठरल्या. शिव ठाकरे, प्रिंस नरुला, करण पटेल, कृष्णा श्रॉफ आणि मिस्टर फैजू यांच्या टीम्सनी आपापल्या स्पर्धा जिंकल्या. विजयासोबत एक मोठी जबाबदारीही आली. विजयी कॅप्टनला हरणाऱ्या पाच टीममधील एका सदस्याला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. सर्वांच्या सहमतीने कंटेस्टंट वंशज सिंह यांना एलिमिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा शो प्रेक्षकांना रोज नवीन टास्क, ड्रामा आणि ट्विस्ट्स देणारा ठरत आहे. तुम्ही हा शो कलर्स टीव्हीवर पाहू शकता किंवा जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...