नीतू कपूर यांची पोस्ट, ऋषी कपूर यांच्यावर कँन्सरचे उपचार?

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मागील काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. तिथे कोणता उपाचर सुरु आहे, काय झालं आहे, याबद्दल सध्या ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांनी मौन बाळगले आहे. पण नुकतेच ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. नीतू कपूर यांच्या पोस्टमुळे ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार सुरु …

नीतू कपूर यांची पोस्ट, ऋषी कपूर यांच्यावर कँन्सरचे उपचार?

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मागील काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. तिथे कोणता उपाचर सुरु आहे, काय झालं आहे, याबद्दल सध्या ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांनी मौन बाळगले आहे. पण नुकतेच ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. नीतू कपूर यांच्या पोस्टमुळे ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार सुरु आहेत की काय अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

मागील वर्षी 29 सप्टेंबरला ऋषी कपूर यांनी एक ट्वीट केले होते, त्यामध्ये त्यांनी  “मी काही दिवस उपचारांसाठी अमेरिकेत जात आहे” असं म्हटलं होतं. मात्र तेव्हापासूनच  त्यांना कॅन्सर झाल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांना चिंता करु नका तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला होता.

काही वृत्तांनुसार, ऋषी कपूर ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्याच रुग्णालयात सोनाली बेंद्रेने कॅन्सरवर उपचार घेतले आहेत.

नितू कपूर यांची पोस्ट

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर न्यू इअर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मुलगी रिद्धिमा कपूर दिसत आहेत.  या फोटोच्या कॅप्शनमध्ये “हॅपी 2019, काही संकल्प नाही, यावर्षी फक्त शुभेच्छा, अपेक्षा करते की , भविष्यात कॅन्सर फक्त एका राशी (कर्क) चे चिन्हं बनून राहूदे. खूप सारे प्रेम, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहूदे” असं म्हटलं आहे.

नीतू कपूरने लिहिलेल्या पोस्टमधील  “Hope in future Cancer is only a zodiac sign’ ही वाक्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळेच ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असावा अशी शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *