AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राधिका आपटेने शेअर केला ‘Mrs. undercover’चं पोस्टर, नवरीच्या कमरेला चक्क रिव्हॉल्वर!

राधिकाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतानाच आपल्या येऊ घातलेल्या 'मिसेस अंडरकव्हर'चं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये राधिकाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

राधिका आपटेने शेअर केला 'Mrs. undercover'चं पोस्टर, नवरीच्या कमरेला चक्क रिव्हॉल्वर!
राधिका आपटेचा नवा चित्रपट 'मिसेस अंडरकव्हर'
| Updated on: Mar 28, 2021 | 9:41 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या दमदार अभिनयाने कलाविश्वात ओळखली जाते. तिच्या अभिनयाची स्तुती करावी तेवढी कमी आहे. राधिकाने होळी दिवशी आपल्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. राधिकाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतानाच आपल्या येऊ घातलेल्या ‘मिसेस अंडरकव्हर’चं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये राधिकाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. (first poster of the new movie Mrs. Undercover from Radhika Apte has been released)

राधिकाने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय की, “भारतीय गृहिणीचं रिव्हॉल्वरसोबतच कॉम्बिनेशन खूप खतरनाक असतं. हो ना? तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या नव्या स्पाय चित्रपटाचं पहिलं पोस्टर. मिसेस अंडरकव्हर”. या चित्रपटात राधिकासोबत सुमित व्यास लीड रोलमध्ये दिसणार आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन अनुश्री मेहता करतेय.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

दर्जेदार कंटेन्टवर आमचा विश्वास – अनुश्री

आम्ही प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देण्यावर विश्वास बाळगतो आणि तो मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. चित्रपटाचं नाव आणि पहिलं पोस्टर लोकांना एस्काईटेड करण्यासाठी शेअर केल्याचं चित्रपटाची दिग्दर्शक अनुश्री मेहताने म्हटलंय. मला आनंद आहे की मला राधिका आपटे सारख्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली, असंही अनुश्रीने म्हटलंय.

राधिका काय म्हणाली?

अनुश्री या चित्रपटासाठी खूप दिवसांपूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि या चित्रपटाची कथा मला खूप आवडली होती. जेव्हा मी पहिला लुक पाहिला तेव्हा पहिल्यासारखीच एक्साईटमेंट होती. तसंच मला वाटत होतं की या चित्रपटाचा हिस्सा बनलं पाहिजे. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या लक्षातही राहायला हवं आणि हे आम्ही योग्यरित्या कॅप्चर केलंय. आता प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटतो याची वाट पाहत असल्याचं राधिकाने म्हटलंय. मिसेस अंडरकव्हर हा चित्रपट इशान सस्केना, अबीर सेनगुप्ता, सुनील शाह आणि वरुण बजाज प्रोड्यूस करत आहेत.

राधिकाच्या गाजलेल्या भूमिका

राधिकाने 2005 मध्ये ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपाद्वारे छोट्याशा भूमिकेतून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘शोर इन द सिटी’, ‘कबाली’, ‘फोबिया’, ‘बदलापूर’ आणि शॉर्ट फिल्म ‘अहल्या’ मध्ये काम केलं. राधिकाला ‘फोबिया’, ‘बदलापूर’, ‘मांझी : द माऊंटन मॅन’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘पॅड मॅन’ आणि ‘घोउल’ या भूमिकेतून बॉलिवूड नायिकेच्या रुढीवादी प्रतिमेला तोडण्यासाठी ओळखला जातो.

इतर बातम्या :

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाला ‘मस्तानी’चा नकार, दीपिका-भन्साळींमध्ये कोल्डवॉर सुरु!

Rakhi Sawant | ‘लोक उगाच म्हणतात आम्ही कॉन्ट्रोवर्सी करतो!’, वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडलेली राखी संतापली, पाहा व्हिडीओ

first poster of the new movie Mrs. Undercover from Radhika Apte has been released

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.