AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची बाजी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीसाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास ठरला. कारण आलियाला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर रणबीरला 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द काश्मीर फाइल्स'ची बाजी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द काश्मीर फाइल्स'ची बाजी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी Image Credit source: Tv9
| Updated on: Feb 21, 2023 | 12:00 PM
Share

मुंबई : ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स’ची घोषणा सोमवारी झाली. या पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ने पटकावला. तर अनुपम खेर यांना ‘मोस्ट व्हर्सेटाइल अभिनेता’ हा पुरस्काराने गौरविण्यात आलं. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीसाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास ठरला. कारण आलियाला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

अभिनेता वरुण धवनने क्रिटिक्स बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार पटकावला. तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कांतारा या चित्रपटाचा अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालिकांच्या विभागात रुपाली गांगुलीच्या ‘अनुपमा’ने बाजी मारली.

विजेत्यांची संपूर्ण यादी-

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- द काश्मीर फाइल्स
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आर. बाल्की (चुप: रेव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: पार्ट 1)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
  • मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर- ऋषभ शेट्टी (कांतारा)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- मनिष पॉल (जुग जुग जियो)
  • फिल्म इंडस्ट्रीतील अमूल्य योगदान- रेखा
  • सर्वोत्कृष्ट वेब सीरिज- रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
  • क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता- वरुण धवन (भेडिया)
  • फिल्म ऑफ द इअर- RRR
  • टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इअर- अनुपमा
  • सर्वांत व्हर्सेटाइल अभिनेता- अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)
  • टेलिव्हिजन सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता- झैन इमाम (फना: इश्क मे मरजांवा)
  • टेलिव्हिजन सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तेजस्वी प्रकाश (नागिन)
  • सर्वोत्कृष्ट गायक- साचेत टंडन (मैय्या मैनू)
  • सर्वोत्कृष्ट गायिका- निती मोहन (मेरी जान)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ- पीएस विनोज (विक्रम वेधा)
  • म्युझिक इंडस्ट्रीतील अमूल्य योगदान- हरिहरन

हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने जाहीर नाराजी व्यक्त केली. सर्व मोठे पुरस्कार स्टारकिड्स घेऊन गेले, असं ती म्हणाली. घराणेशाहीच्या माफियांनी स्वकर्तृत्वावर पुढे येणाऱ्या लोकांचं करिअर उद्ध्वस्त केल्याचाही आरोप तिने केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...