AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द केरळ स्टोरी 2’मध्ये 7-8 नव्हे तर 16 मोठे बदल; लिप लॉक, बलात्काराचे सीन्स अन् बरंच काही..

येत्या शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यात 16 बदल आणि कट्स सुचवले आहेत. 'द केरळ स्टोरी 2' हा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी'चा दुसरा भाग आहे.

'द केरळ स्टोरी 2'मध्ये 7-8 नव्हे तर 16 मोठे बदल; लिप लॉक, बलात्काराचे सीन्स अन् बरंच काही..
द केरळ स्टोरी 2Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2026 | 12:59 PM
Share

‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याआधी सेन्सॉर बोर्डाने त्यात 16 बदल आणि कट्स सुचवले आहेत. सर्वसामान्यपणे अशा चित्रपटांमध्ये अनेक संवेदनशील आणि त्याचसोबत अंगावर काटा आणणारी दृश्ये असतात. त्यामुळे सेन्सॉर सर्टिफिकेशनद्वारे त्यावर मर्यादा आणली जाते. परंतु यावेळी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला U/A 16+ चं प्रमाणपत्र दिलं आहे. परंतु त्याचसोबत काही बदलसुद्धा सुचवले आहेत. हे बदल आणि कट्स कोणकोणते आहेत, ते पाहुयात..

‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’मध्ये 16 कट्स

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’मध्ये 16 कट्स आणि बदल सुचवले आहेत. – या चित्रपटातील किसिंग सीन्स 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. लिप-लॉक सीन 7 सेकंदांनी छोटा करण्यात आला आहे. – बलात्काराचे व्हिज्युअल्ससुद्धा 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. हे सीन्स 20 सेकंदांनी कमी करण्यात आले आहेत. – दोन सीन्स, एकामध्ये एका महिलेच्या कानाखाली वाजवलं जातं आणि दुसऱ्या सीनमध्ये एका महिलेच्या डोक्याला मार लागतो, यांनाही 2 सेकंदांनी कमी करण्यात आलं आहे. – आरोपीला बुलडोझरने पाडल्याच्या दृश्यांना बदलण्यास सांगितलं गेलं. – तीन वेगवेगळ्या दृश्यांमध्ये तीन डायलॉग बदलले, तर एका शब्दाला म्यूट करण्याची सूचना दिली. परंतु कट लिस्टमध्ये याबद्दलची माहिती नाही. – हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचं डिस्क्लेमर जोडण्याची निर्मात्यांना सूचना देण्यात आली. – स्टॅटिक टेक्स्टचा (डिस्क्लेमर) स्क्रीनटाइम आणि त्यासोबत व्हॉइस ओव्हरसुद्धा 2 मिनिट 3 सेकंदांनी वाढवण्यास सांगितलं आहे. – निर्मात्यांना स्क्रिप्टच्या डायलॉगच्या हिशोबाने स्क्रीप्ट जमा करण्याचे आणि चित्रपटात दाखवलेल्या सत्य घटनांसाठी योग्य ती कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – चित्रपटात एका छोट्या कलाकाराला समाविष्ट करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला एक सहमती पत्र देण्यात आलं आहे.

‘द केरळ स्टोरी 2’चा रनटाइम

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यानंतर या चित्रपटाला 16 फेब्रुवारी रोजी सेन्सॉर सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र देण्यात येईल. सेन्सॉर सर्टिफिकेटवर या चित्रपटाचा रनटाइम 131.24 मिनिटांचा आहे. म्हणजेच ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 2 तास, 11 मिनिटं आणि 24 सेकंदांचा आहे.

विपुल शाह निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी केलं आहे. यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 27 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...