AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : मुस्लिम अभिनेत्रीने विवाहित ब्राह्मण पुरुषाशी लग्न उरकलं तेव्हा…, म्हणालेला, ‘हा विवाह एक दैवी चमत्कार, मी हिंदू पण.. ‘

Love Life : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये अडचणी तेव्हा येतात जेव्हा दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा विषय असतो. असंच काही बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत झालं. तिने विवाहित ब्राह्मण पुरुषाशी लग्न उरकलं... जाणून घ्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी...

Love Life : मुस्लिम अभिनेत्रीने विवाहित ब्राह्मण पुरुषाशी लग्न उरकलं तेव्हा..., म्हणालेला, 'हा विवाह एक दैवी चमत्कार, मी हिंदू पण.. '
Love Life
| Updated on: Oct 23, 2026 | 10:57 AM
Share

लग्न हा नशिबाचा भाग असतो, पण लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठी टप्पा आहे. अशात लग्न दुसऱ्या धर्मात करण्याची वेळ आली तर, मोठ्या अडचणी येतात. असंच काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे. अभिनेत्रीच्या संसाराला आज 19 वर्ष झाली आहेत. विवाहित आणि ब्राह्मण पुरुषाची लग्न केल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती स्वतः मुस्लिम असून तिचा नवरा ब्राह्मण आहे… तर अभिनेत्रीसोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीचा नवरा म्हणालेला, ‘हा विवाह एक दैवी चमत्कार आहे…’, जाणून घ्या अभिनेत्री कोण आहे, जिने ब्राह्मण पुरुषाची लग्न केलं.

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेली अभिनेत्री शाबाना रजा हिने अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासोबत लग्न केलं. सांगायचं झालं तर, मनोज याचं आधी अरेन्ज मॅरेज झालं होतं, पण जेव्हा अभिनेता मुंबईत आला, तेव्हा त्याचं लग्न मोडलं. त्यानंतर एका पार्टीत मनोज याची ओळख शबाना हिच्यासोबत झाली. ‘सत्या’ सिनेमात ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका साकारून मनोजने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दरम्यान, शबानाने 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘करीब’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

जरी ‘करीब’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, तरीही शबानाच्या अभिनयाची दखल घेतली गेली आणि या सिनेमामुळे तिला नक्कीच ओळख मिळण्यास मदत झाली. पण अभिनेत्री करियर बॉलिवूडमध्ये फार काळ चाललं नाही. त्यानंतर मनोज वाजपेयी याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री चर्चेत आली. लग्नाबद्दल अभिनेत्रीने एका मुलखातीत देखील सांगितलं.

‘घरात एकत्र राहिल्यानंतर मिळतो आनंद…’

2006 मध्ये शबाना हिने एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली. ‘मनोज आणि मी एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो… आम्ही प्रोफेशनल आणि खासगी गोष्टी कधीच एकमेकांसोबत जोडत नाही. आमचं नातं फार घट्ट आहे. मनोज आणि मला कधीच घराबाहेर जाण्याची गरज भासत नाही. आम्ही घरातच अनेकदा एकत्र चहा पितो… घरातच एकत्र राहिल्यानंतर आम्हाला आनंद मिळतो… ‘

‘आमच्या लग्नावर कोणी आक्षेप घेतला नाही…’

मनोज आणि शबाना यांनी धर्माच्या सर्व सीमा ओलांडून लग्न केलं. एका मुलाखतीत मनोज म्हणालेला, “आमच्या लग्नाबाबत काहीसा सामाजिक दबाव नक्कीच होता. मात्र, आमची कुटुंबं अत्यंत पुरोगामी विचारांची असल्याने आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. मी ब्राह्मण कुटुंबातून येतो आणि माझ्या पत्नीचे कुटुंबही अत्यंत प्रतिष्ठित आहे. आजही आमच्यापैकी कोणाच्याही कुटुंबाने आमच्या लग्नावर कधीही आक्षेप घेतलेला नाही. माझी पत्नी मुस्लिम असल्याचा अभिमान बाळगते, ज्याप्रमाणे मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. या गोष्टींवरून आमच्यात कधीही कोणताही वाद होत नाही.”

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ