AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Case : ट्रेनमध्येच केस कापले, भुजिया खायला स्टेशनवर उतरले अन् खेळ खल्लास; इन्साईड स्टोरी काय?

टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी ट्रेनमध्ये केस कापले, कपडे बदलले. मात्र, भुकेमुळे एका आरोपीने भुजिया घेण्यासाठी स्टेशनवर उतरताच RPF जवानांनी त्याला ओळखले. त्यानंतर, त्यांच्या इतर साथीदारांनाही पकडून टायगरवरील हल्ल्याचा कट उघड झाला, ज्याचा मास्टरमाइंड परदेशातून सूत्रे हलवत होता.

Tiger Shroff Case : ट्रेनमध्येच केस कापले, भुजिया खायला स्टेशनवर उतरले अन् खेळ खल्लास; इन्साईड स्टोरी काय?
Tiger Shroff CaseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 11:36 AM
Share

Tiger Shroff Case : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आरोपीची पिस्तुल जाम झाली नसती तर मोठा अनर्थ ओढवला असता. पण नशीब बलवत्तर म्हणून टायगर वाचला. पोलिसांनीही या प्रकरणात वेगाने तपास करून आरोपींना अटक केली आहे. काल सकाळीच राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकातून आरोपींना अटक केली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या अटकेची इन्साईड स्टोरी आता समोर आली आहे. या तिघांनीही पकडले जाऊ नये म्हणून ट्रेनमध्येच केस कापले होते. कपडेही बदलले होते. तसेच भूख लागली म्हणून एक आरोपी रेल्वे स्थानकात भुजिया घ्यायला उतरला आणि नेमका तिथेच त्यांचा खेळ खल्लास झाला.

आरपीएफच्या सतर्क जवानांनी या आरोपीला ओळखले. तात्काळ ते बोगीत शिरले आणि त्यातील अल्पवयीन आरोपीशी विचारपूस सुरू केली. मुंबईवरून तुम्ही तिघेजण ट्रेनमध्ये बसला ना? त्यावर आरोपी म्हणाला, ते दोघे झोपले आहेत. एवढं ऐकताच आरपीएफ जवानांनी या तिघांना लगेच अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी करताच या तिघांनीच टायगरवर हल्ला केल्याचं उघड झालं. या हल्ल्याप्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड अनिल पंडितने रिहानला टायगरच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानेच रिहानला विदेशात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं.

कॅलिफोर्नियातून संपर्क

अनिल पंडित कॅलिफोर्नियातून लाइव्ह येऊन आदेश देत होता. त्याने हल्ल्यासाठी शस्त्र उपलब्ध करून दिली. कथितपणे 2.50 लाख रुपये अॅडव्हान्स दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिकवर टायगरच्या लोकेशनची रेकी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आरोपी मुंबईतील एका हॉटेलात एक महिन्यापासून राहत होते. अनिल पंडित त्यांना खर्चासाठी रोज 5 ते 10 हजार रुपये पाठवत होता. आरोपी वेगवेगळ्या दुकानदारांना ऑनलाइन पैसे पाठवून त्यांच्याकडून रोख रक्कम घेत होते. अनिल पंडित हा आरोपींच्या संपर्कात कथितपणे जंगी अॅपच्या माध्यमातून होता. याच अॅपवरून तो आरोपींना सूचना देत होता.

वरच्या सीटवर दोघे…

आरोपी दिल्लीत आल्यावर त्यांना नेपाळला पाठवण्याची योजना होती. आरोपी रिहानचे केस खूप लांब होते. त्यामुळे तो ओळखला जाऊ शकला असता. त्यामुळे हल्ला केल्यानंतर ट्रेनमध्ये त्याचे केस कापण्यात आले. त्यानंतर तिघांनी कपडे बदलले. हे तिघे ट्रेनच्या वेगवेगळ्या कोचमध्ये नव्हते. तर एकाच कोचमध्ये वेगवेगळ्या सीटवर बसले होते. कोटाला जाईपर्यंत दोन आरोपी वरच्या सीटवर झोपले होते. कोटामध्ये ट्रेन थांबल्यावर एक अल्पवयीन आरोपी रिहान खाली उतरून वेंडरकडून भुजिया खरेदी करत होता. तिथे साध्या वेषात असलेल्या आरपीएफ जवानाने त्याला ओळखले. त्यानंतर हे जवान डब्यात गेले आणि त्याच्या सीटच्या बाजूला बसले. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. तुम्ही तिघे मुंबईवरून एकत्र ट्रेनमध्ये बसले. बाकी दोघे कुठे आहेत? असं विचारताच तो घाबरला. त्याने इतर सहकारी झोपले असल्याचं सांगितलं.

त्यानंतर त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना उठवलं. दोघे उठताच जवानांनी त्यांनी पकडलं. मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपींसारखे तुमचे चेहरे आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक केली जात आहे, असं जवानांनी त्यांना सांगितलं. त्यांची अधिक चौकशी केली असता हे तिघेही आरोपी असल्याचं उघड झालं.

Follow Us
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं