सलमान खान आणि एकनाथ शिंदे दोघांचा खास असलेल्या नेत्याने मुंबई पोलीस कमिश्नरला पत्र लिहून मागितलं संरक्षण

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. खासकरुन सलमान खानच्या जवळ असलेल्या माणसांना जास्त धोका आहे. अशाच एका सलमान आणि शिंदेंच्या जवळ असलेल्या माणसाने पोलीस संरक्षण मागितलं आहे.

सलमान खान आणि एकनाथ शिंदे दोघांचा खास असलेल्या नेत्याने मुंबई पोलीस कमिश्नरला पत्र लिहून मागितलं संरक्षण
Eknath Shinde-Salman Khan
| Updated on: Oct 21, 2026 | 3:34 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर शिवसेना नेते राहुल कनाल यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. राहुल कनाल एकनाथ शिंदे शिवसेनेचा सदस्य आहे. माझं घर आणि कार्यालयाची तीनवेळा रेकी केल्याचा दावा राहुल कनाल यांनी केला आहे. राहुल कनाल यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोबत चांगले संबंध आहेत. स्वत:च्या जिवीताला असलेल्या धोक्याबद्दल कनाल यांनी चिंता व्यक्त केली व मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. जुहूमध्ये फुटबॉल मॅच खेळून निघालेल्या टायगर श्रॉफच्या कारवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. 18 ऑक्टोंबरची ही घटना आहे. टायगर श्रॉफच्या कार चालकाला आणि एका रिक्षावाल्याला गोळी लागलेली. टायगर श्रॉफला किरकोळ दुखापत झाली.

या प्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे. फूल सिंह, रितिक कुमार आणि रेहान अशी तीन हल्लेखोरांची नावं आहेत. बुधवारी पहाटे तिघांना राजस्थान कोटा येथून मुंबईला आणण्यात आलं. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अनमोल बिश्नोईच्या नावाने एक सोशल मिडिया पोस्ट फिरत होती. हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे मेसेजेस होते.

Loading...

काय म्हटलेलं इशारा देताना?

टायगर श्रॉफशी संपर्क साधून आम्ही त्याला इशारा दिला होता. पण त्याने इशाऱ्याला गांभीर्याने घेतलं नाही असं त्या पोस्टमध्ये लिहिलेलं. पोस्टमध्ये मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना इशारा देण्यात आलेला. जे आमचं म्हणणं ऐकणार नाहीत, सलमान खान सोबत काम सुरु ठेवतील त्यांचा पुढचा नंबर असेल असं या इशाऱ्यामध्ये म्हटलेलं.

व्हॉइसबँकची अशीच तपासणी

बिश्नोई गँगच्या टोळीतील सदस्यांचे ऑडियो असलेली व्हॉइसबँक पंजाब, दिल्ली आणि राजस्थान पोलिसांकडे आहे. आतापर्यंत सलमान खान, आमिर खान, रोहित शेट्टी, बाबा सिद्दीकी आणि इतरांना आलेल्या धमकीच्या ऑडियो क्लिप व्हॉइसबँकची अशीच तपासणी करण्यात आली होती.यावेळीही टायगरवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर अनिल पंडितची ऑडियो क्लिप आलेली होती. त्याचीही अशीच तपासणी केली जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us