AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडक कथा, दमदार कलाकार..; 2026 मधला आतापर्यंतचा सर्वांत खतरनाक ट्रेलर

भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'तिघी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

कडक कथा, दमदार कलाकार..; 2026 मधला आतापर्यंतचा सर्वांत खतरनाक ट्रेलर
Tighee TrailerImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 25, 2026 | 10:12 AM
Share

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण.. कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं.. तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘2026 मधला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक ट्रेलर आहे हा,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘अप्रतीम काम, उत्सुकता ताणून धरणं याला म्हणतात,’ असं दुसऱ्याने लिहिलंय. ट्रेलर एवढा मस्त आहे, तर चित्रपट कसा असेल, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी उत्सुकता निर्माण केली आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अधिक ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा या सगळ्याचं प्रभावी चित्रण यात पाहायला मिळतं. तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसतेय. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहाणार, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्येही ठळकपणे जाणवते. घर हे फक्त चार भिंतींचं नसून तिथे साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक ठरतं. तिघींच्या नात्यातील ताणतणाव आणि त्यामागची माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “आई आणि मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते भांडणांतून व्यक्त होतं, कधी शांततेतून. ‘तिघी’मधून आम्ही या नात्याची खरी, प्रामाणिक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि स्वतःचं नातं दिसेल.” या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या 6 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आयुष्याच्या त्या वळणावर तिघी एकमेकींना कशी साथ देतात याचं उत्तर मोठ्या पडद्यावरच मिळणार आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...