AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC : महिनाभराच्या भूताच्या ट्रॅकचा फज्जा? चोर निघालं मांजर, ‘तारक मेहता’ ट्रोल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'भूत' ट्रॅकने प्रेक्षकांना आकर्षित केलं. पुतळा चोरी करत असल्याचा संशय असताना, सीसीटीव्ही फुटेजमधून चोर कोणी भूत नव्हे तर एक प्रशिक्षित मांजर असल्याचे समोर आलं. पण या अनपेक्षित खुलाशाने चाहते चांगलेच निराश झाले आहेत. अनेकांनी हा ट्रॅक कंटाळवाणा ठरवत शो ट्रोल केलं आहे.

TMKOC : महिनाभराच्या भूताच्या ट्रॅकचा फज्जा? चोर निघालं मांजर, ‘तारक मेहता’ ट्रोल
| Updated on: Sep 28, 2026 | 5:47 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या शोमध्ये जेव्हा भुताचा सीक्वेन्स येतो, तेव्हा शोचा टीआरपी जबरदस्त वाढतो. गेल्या काहि दिवसांपासून शोमध्ये भूताशी निगडीत ट्रॅक दाखवण्यात येत आहे. ते भूत कोण असेल किंवा भूत बनून गोकुळधाम सोसायटीच्या रहिवशांना कोणा घाबरवतंय, हे जाणून घेण्यास चाहते खूपच उत्सुक होते. मात्र या मागे नेमकं कोण आहे, ते समोर आल्यावर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. शोचा हा ट्रॅक टक्क ट्रोल होतोय. चला याबद्दल जाणून घेऊया.

पुतळ्याने केली चोरी, सोसायटीमध्ये हंगामा

तारक मेहता शोमध्ये दाखवण्यात आलं होतं की, पोपटलाल हा एक दुल्हनचा, नववधूचा पुतळा घेऊन येतो. मात्र तो पुतळा सोसायटीत येताच चोरी व्हायला सुरूवात होते. त्यानंतर तपासासाठी पोलिसांना पाचारण करण्यात येतं. पोलिसांनी तपास केल्यावर चोरीचं सगळं सामान पोपटला याच्या घरातून मिळतं. सगळं सामान त्या पुतळ्याजवळ असतं. अखेर पोलीस पोपटलालला अटक करतात. पण चोरी पुतळ्याने केली आहे असं पोपटलाल सोसायटीमधल्य लोकांना सांगतो. तेव्हा पुतळा विचित्र हरकती करायला लागतो, आणि त्याच्या चेहऱ्यावर असलेला घुंगट, आपोआपा बाजूला होतो.

भूत नव्हे मांजरच चोर ?

सोसायटीमध्ये होत असलेल्या चोऱ्यांमागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेत असताना संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला त्या पुतळ्यात भूत असल्याचा संशय येतो. मात्र आता या प्रकरणात एक वेगळेच सत्य समोर आलं.सोसायटीमध्ये ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणत्याही भुताने नव्हे तर मांजरीने केल्याचं समोर आलं. खरंतर सोसायटीतील लोकांना सुरुवातीपासूनच पुतळ्याबद्दल संशय वाटत असतो. त्या पुतळ्यात भूत असून तेच सोसायटीमध्ये चोरी करत असल्याचं सर्वांना वाटू लागतं.  एके रात्री तर भूताच्या नावाने सोसायटीमध्ये चांगलाच गोंधळ उडतो.  अखेर सोसायटीतील लोक देवाच्या चरणी जातात आणि या संकटातून आपली सुटका व्हावी, अशी प्रार्थना करतात. याच दरम्यान रत्नाची मुले एक महत्त्वाची माहिती देतात. त्यांनी सोसायटीमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात चोरीची संपूर्ण घटना रेकॉर्ड झाल्याचं ते सांगतात. त्यानंतर सर्वजण मिळून सीसीटीव्ही फुटेज तपासतात. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्यातून जे सत्य समोर येतं, त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसतो.

चोरी करणारं कोणी भूत नव्हे तर ते एक मांजर असतं. कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, या मांजरीला चोरी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेलं असतं. सोनं दिसलं रे दिसलं की ते उचलून नेण्याची तिला सवय लावण्यात आलेली असते. त्यामुळे सोसायटीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये या मांजरीचा मोठा हात असल्याचं समोर येतं. यानंतर संपूर्ण सोसायटी त्या मांजरीला पकडण्यासाठी धावपळ करू लागते. मात्र मांजर काही सहज त्यांच्या हाती लागत नाही. अखेर तिला दूध दाखवून तिचा विश्वास संपादन केला जातो आणि मोठ्या प्रयत्नांनंतर मांजरीला पकडण्यात यश मिळतं.

चोराचा खुलासा झाल्याने चाहते नाराज

चोर म्हणून मांजरीचा खुलासा झाल्यानंतर मात्र मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आहे. “ तारक मेहता मालिकेत मांजराने चोरी केली. मी गेल्या महिन्यापासून भूत-प्रेताचा ट्रॅक पाहत होते. मला वाटलं होतं की, काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. पण एवढा मोठा ट्रॅक दाखवल्यानंतर शेवटी चोर म्हणून मांजराला दाखवले. जुने कलाकार आणि जुने कॅरेक्टर किती चांगले होते. आधी अनेक कलाकार मालिकेतून गेले आणि आता त्यातही एवढे कंटाळवाणे ट्रॅक दाखवले जात आहेत. आता मला हा शो बघायचाच नाही,” असं लिहीत एका युजरने निराशा व्यक्त केली. तसेच दुसऱ्या एका चाहत्यानेही आपली नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले, ‘ आम्हाला आजपर्यंत एवढं वाईट कधीच वाटलं नव्हतं .आपण हा शो पाहणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,’  असं त्याने सांगितलं. एकंदरच या ट्रॅकवर बरीच टीका केली जात आहे.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा