Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला हादरा देणारा अभिनेता, सलग 14 हिट सिनेमे दिले, संपत्ती तब्बल 1700 कोटी; नाव वाचून चकित व्हाल!

या अभिनेत्याने आतापर्यंत तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड या भाषेतील चित्रपटांत काम केलेले आहे. त्यांनी तीन नंदी पुरस्कार, नऊ फिल्मफेयर अवॉर्ड साऊथ, लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळवलेला आहे. 2006 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला हादरा देणारा अभिनेता, सलग 14 हिट सिनेमे दिले, संपत्ती तब्बल 1700 कोटी; नाव वाचून चकित व्हाल!
actor chiranjeevi and amitabh bachchan
Image Credit source: ptoto credit- sakshi.com
| Updated on: Oct 15, 2026 | 5:37 PM

Chiranjeevi And Amitabh Bachchan : दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग आज यशस्वी अभिनेते म्हणून ओळखते. अमिताभ भच्चन याचे वय आज 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. तरीदेखील ते सिनसृष्टीत सक्रीय असून अनेक महत्त्वाच्या चित्रपटात दिसून आलेले आहेत. त्यांनी आपला काळ चांगलाच गाजवला. आजही त्यांचे बॉलिवुडमधील वजन कमी झालेले नाही. त्यांच्या तोडीचा आज एकही अभिनेता नाही, असं म्हटलं जातं. त्यांचा अभिनय हा सर्वोत्तम असल्याचे अनेकजण सांगतात. परंतु सिनेसृष्टीत असा एक अभिनेता होऊन गेला ज्याने सिनेसृष्टीत वेगळाच दबदबा निर्माण केला. या अभिनेत्याने अभिनयाच्या जोरावर सगळं जिंकलंच पण त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलेले आहे. या अभिनेत्याने कधीकाळी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त फी घेतल्याचे सांगितले जाते.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड

या अभिनेत्याचे नाव चिरंजीवी असे आहे. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत आजही त्यांचा तेवढाच दबदबा आहे. कसदार अभिनय आणि शानदार नृत्य याच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट सुपरहीट करून दाखवले. तेलुगू सिनेमात त्यांची एक वेगळी ओळख आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांची यशस्वी अभिनेता-नर्तक म्हणून नोंद आहे. 22 ऑगस्ट 1955 रोजी आंध्र प्रदेशातील मोगलथूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव कोणिदेल शिव शंकर वर प्रसाद असे आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनय आवडायचा. अभिनयाचे धडे घेण्यासाठी ते चेन्नईत पोहोचले. त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1978 साली त्यांचा पहिला चित्रपट आला. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

Loading...

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा घ्यायचे जास्त फी

चिरंजीवी यांनी आतापर्यंत तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड या भाषेतील चित्रपटांत काम केलेले आहे. त्यांनी तीन नंदी पुरस्कार, नऊ फिल्मफेयर अवॉर्ड साऊथ, लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळवलेला आहे. 2006 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2024 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. ते कधीकाळी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही वरचढ ठरले होते, असे सांगितले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी काही चित्रपटांत अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त फी घेतली होती. परंतु याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. त्यांची एकूण संपत्ती 1700 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us