Salman Khan Bigg Boss Weekend Ka Vaar : सलमान खान यंदा ‘वीकेंड का वार’ होस्ट करणार नाही! टायगरवरील हल्ल्याशी संबंध की दुसरंच कारण?
या आठवड्यात 'बिग बॉस'च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान नव्हे तर होस्ट म्हणून रोहित शेट्टी दिसणार आहे. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याचं याच्याशी कनेक्शन आहे का ?

भिनेता टागयर श्रॉफवर काल झालेल्या गोळीबाराने सर्वच हादरले. लॉरेन्स बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली असून इंडस्ट्रीची झोपच उडाली आहे. याच दरम्यान आता ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोशी निगडीत एक बातमी समोर आल्याने चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रिपोर्ट्सनुसार, यंदा सलमान खान हा ‘बिग बॉस’ चा ‘वीकेंड का वार’ होस्ट करणार नाहीये. त्याच्या जागी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी या शोची कमान सांभाळणार आहे. सलमान यंदा वीकेंड का वारमध्ये दिसणार नसल्याची बातमी समर येताच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.
रविवारी, म्हणजे कालच टायगर श्रॉफवह हल्ला झाला, त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. तो हल्ला आणि सलमान खानच्या निकटवर्तींयाना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळत असलेल्या धमक्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे का ? असा सवाल अनेक लोकांच्या मनात आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सलमानने या आठवड्यात बिग बॉसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे का ? जाणून घेऊया सत्य..
काय आहे खरं कारण ?
तुम्हीदेखील या चर्चा आणि अफवांना खरं मानत असाल, तर थांबा ! खरं यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. लॉरेन्स गँग किंवा टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याशी सलमान खानच्या या बदलाचा संबंध जोडून पाहिला, तर घटनांच्या वेळेचं गणित त्याच्या अगदी उलट असल्याचं दिसून येत आहे. कारण ‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’चं शूटिंग साधारणपणे आधीच ठरलेलं असतं, त्या टाइमटेबलनुसार, शुक्रवारी किंवा त्याच्या आसपास या शोचं शूटिंग केलं जातं. तर दुसरीकडे, अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला हा गोळीबार, हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडी या, काल म्हणजेच रविवारी घडल्या.
सलमानने आधीच दिले होते संकेत
बिग बॉस च्या वीकेंड का वारमध्ये सलमान न दिसण्याच कारण वेगळं आहे. यामागचं कारण म्हणजे सलमान खानची आधीपासूनच काही कामं आणि कमिटमेंट्स ठरलेल्या होत्या. त्यामुळे या आठवड्यात त्याला शोसाठी वेळ काढता आला नाही. याच कारणामुळे निर्मात्यांनी त्याच्या जागी रोहित शेट्टीकडे या आठवड्याच्या विशेष ‘वीकेंड का वार’चं सूत्रसंचालन सोपवलं आहे. ही गोष्ट खुद्द सलमाननेच रविवारच्या एपिसोडच्या शेवटी स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना सांगितली होती.
मात्र, या विषयावर कितीही तर्कवितर्क लावले जात असले, तरी एक गोष्ट नक्की आहे की, या वीकेंडला सलमानचे चाहते त्याला नक्कीच मिस करतील. दुसरीकडे, रोहित शेट्टीची दमदार आणि उत्साही शैली शोमध्ये एक नवा रोमांच निर्माण करेल!