Tukaram Mundhe : नानांचा फोन आला अन्…तुकाराम मुंढे यांनी सांगितली नाना पाटेकरांची शेवटची आठवण

Tukaram Mundhe On Nana Patekar : तुकाराम मुंढे यांनी नाना पाटेकर यांची आठवण सांगितली आहे. नानांचं मन हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होतं, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

Tukaram Mundhe : नानांचा फोन आला अन्...तुकाराम मुंढे यांनी सांगितली नाना पाटेकरांची शेवटची आठवण
| Updated on: Oct 14, 2026 | 7:45 PM

रवी खरात – Tv9 मराठी, प्रतिनिधी 

 

Loading...

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर कलाकारांनी, तसेच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेही उपस्थित होते. अशातच आता मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात नाना पाटेकर यांची आदरांजली सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेला तुकाराम मुंढेही उपस्थित होते. त्यांनी भावुक होत, नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली असून नानांबद्दल भाष्य केलं आहे.

काय म्हणाले तुकाराम मुंढे?

तुकाराम मुंढे म्हणाले की, ‘जेव्हा दुष्काळ होता तेव्हा नाना पाटेकर सोलापूरला आले होते. नाना बांधावर जायचे तेव्हा म्हणायचे आपल्याला माणसाला आपण मदत करु शकत नाही, तो काय माणूस. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी ते विचार करत होते. खरं नानांचं मन हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होतं. नानांचा फोन आला होता तेव्हा ते लव्ह यु बाळा असंही म्हणाले होते. नाना आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत.’

मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत‘ या वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात नाना पाटेकर यांच्या आठवणी लिहिल्या होत्या. यात मकरंद यांनी लिहिलेलं की, ‘मी पुण्याला प्रवासात होतो. त्यावेळी तुकाराम मुंढे साहेबांचा फोन आला. ते आमचे खूप जवळचे मित्र. त्यांना खूप धक्का बसला होता. ते म्हणाले, दिवाळीनंतर नाना माझी जाहीर मुलाखत घेणार होते. खूप गोष्टी राहिल्या… ते गोव्याला जाण्यापूर्वी आम्हाला सांगून गेले होते की, दुष्काळ यंदा जास्त दिसतोय. आपण सगळ्यांशी चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल, ते बघूया…’

दरम्यान, नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘सलाम बॉम्बे!’ आणि ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना मोठं यश मिळाले. त्यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’ आणि ‘राजनेती’ यांसारख्या चित्रपटांमध्येही उत्कृष्ट अभिनय केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us