MALANG MOVIE REVIEW : शेवटच्या क्षणी चुकलेला नेम ‘मलंग’

मोहित सुरी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो जहर, आवारापन, राज 2, मर्डर 2, एक व्हिलन. थ्रिलर-अॅक्शन सिनेमा, त्याला रोमान्सची जोड ही मोहितच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं.

MALANG MOVIE REVIEW : शेवटच्या क्षणी चुकलेला नेम 'मलंग'
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 7:58 PM

मोहित सुरी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो जहर, आवारापन, राज 2, मर्डर 2, एक व्हिलन. थ्रिलर-अॅक्शन सिनेमा, त्याला रोमान्सची जोड ही मोहितच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं. मधल्या काळात त्याने आशिकी 2, हमारी अधुरी कहाणी, हाफ गर्लफ्रेण्ड सारखे रोमॅण्टिक चित्रपटही दिग्दर्शित केले, पण यातला ‘आशिकी 2’सोडला तर बाकी भट्टी काही जमून आली नाही. आता पुन्हा एकदा ‘मलंग’च्या निमित्तानं मोहितनं आपल्या आवडत्या जॉनरला हात घातला आहे. या चित्रपटात रोमान्स आहे, अॅक्शन आहे, थ्रील आहे. करमणूकीचं साधन असलेला सगळा मामला या सिनेमात आहे, पण तरीही मध्यंतरानंतर कथा ढेपाळल्यामुळे ‘मलंग’ फसला आहे. मोहितचा मर्डर 2 असेल किंवा एक व्हिलन खलनायक कोण आहे याचं उत्तर आपल्याला आधीच मिळतं. पण तरीही शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात. हीच स्टाईल मोहितनं याही सिनेमात वापरलीये, पण नेमका शेवटच्या क्षणी त्याचा नेम चुकल्यामुळे गडबड झालीये.

ही कथा आहे अद्वैत ( आदित्य रॉय कपूर) आणि साराची (दिशा पटनी). मनमौजी स्वभावाचा अद्वैत आणि लंडनहून भारतात काहीतरी थ्रिलींग करण्यासाठी आलेली सारा यांची गोव्यात अपघातानं भेट होते. नंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात होतं, दोघं लग्न करण्याचा निर्णय घेतात. अचानक अशी काही घटना घडते की दोघं वेगळे होतात. आदित्यला 5 वर्षांचा कारावास होतो. कारागृहातुन बाहेर आल्यावर आदित्य एक मिशन हातात घेतो. दरम्यान, ख्रिसमस नाईट्सला गोव्यात एका मागोमाग एक 3 पोलीस ऑफिसर्सचा मर्डर होतो. या मर्डरचा गुंता सोडवण्याची जबाबदारी येते इन्सपेक्टर अंजनेय आगाशे(अनिल कपूर) आणि क्राईम ब्रॉच हेड मायकलवर (कुणाल खेमु). मग सुरु होतो एका रात्रीतला थरार.आता अद्वैत-सारा वेगळे काय होतात? अद्वैत जेलमध्ये का जातो? सिरिअल किलर कोण असतो? अद्वैत कोणत्या मिशनवर असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘मलंग’ बघितल्यावर मिळतील.

मोहितनं सिनेमाची हाताळणी उत्तम केलीये. एकाचवेळेस भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घातल्यामुळे हा मामला रंजक झालाये. कदाचित जर ह्या दोन घटना वेगवेगळ्या दाखवल्या असत्या तर सिनेमा कंटाळवाणा होण्याची शक्यता होती, मात्र एकाच वेळेस भूतकाळ-वर्तमानकाळातील घटनाक्रम सादर केल्यामुळे सिनेमा बघतांना मजा येते. सिनेमाचा पूर्वाध भन्नाट झालाये..वर्तमानासोबतच भूतकाळात घडणाऱ्या घटनांमध्ये आपण हरवत जातो. त्यामुळे उत्तरार्धाकडून आपल्या अपेक्षा वाढतात, मात्र उत्तरार्धात हा सिनेमा ढेपाळला आहे. पटकथेत झालेला गोंधळ, कमकुवत एडिटींग आणि सिनेमावरची दिग्दर्शकाची सुटलेली पकड ह्या गोष्टी याला कारणीभूत ठरल्या आहेत. सिनेमातील संवादही कमकुवत आहेत. यावर मोहितनं लक्ष दिलं असतं तर हा उत्तम थ्रिलरपट झाला असता. जर तुम्ही या सिनेमाचा ट्रेलर लक्षपूर्वक पूर्ण बघितला असेल शेवट नेमका काय होणार, यात रहस्य काय दडलं असेल याचा अंदाज तुम्हाला येईल, पण या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच शेवटचा ट्विस्ट बघून तुम्हाला धक्का बसेल. एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगावीशी वाटतेय की, जर या सिनेमाचं नाव ‘मलंग’ ऐवजी ‘एक व्हिलन 2′ ठेवलं असतं तरी चाललं असतं. कदाचित हिट फ्रॅचाईसीचा फायदा झाला असता. सिनेमातले चेसिंग सिक्वेन्स भन्नाट आहेत.

अनिल कपूरनं आगाशे या कायदा न मानणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत कमाल केलीये. त्याच्यामुळे या सिनेमात खऱ्या अर्थानं जान आलीये. आदित्य रॉय कपूरवर थोडा आशिकी 2चा प्रभाव जाणवतो. एक्शन सीन्समध्ये मात्र त्यानं कमाल केलीये. सिनेमातलं सरप्राईज पॅकेज आहे कुणाल खेमु. बऱ्याच वर्षांनी कुणालला उत्तम रोल मिळालाये. त्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. क्राईम ब्रांच ऑफिसर मायकलच्या भूमिकेत कुणाल चांगलाच लक्षात राहतो. हा सिनेमा बघण्याचं अजून एक कारण म्हणजे दिशा पटनी. दिशा सिनेमात कमालीची हॉट दिसलीये. तिच्यावरुन अजिबात नजर हटत नाही. हा सिनेमा दिशासाठी टर्निंग पाईंट ठरु शकतो. कारण याआधीच्या सिनेमात दिशाकडे करण्यासारखं काही नव्हतं. या सिनेमात मात्र तिनं प्रभावित केलंय. अमृता खानविलकर, मकरंद देशपांडे, एली अवराम यांनीही छोट्या भूमिकेत लक्ष वेधलं आहे. विवेक सिवारमनचा कॅमेरा भन्नाट फिरलाये.गोव्यातली ख्रिसमस नाईट त्यानं उत्तम हेरलीये. सिनेमाची गाणी आधीच हिट झालीयेत..’ हुई मे मलंग’ गाण्यावर दिशानं केलेला डान्स भन्नाट आहे. शिवाय ‘चल घर चले’, ‘हमराह’ ही गाणीही श्रवणीय आहेत.

एकूणच काय जर या सिनेमाचा उत्तरार्ध ढेपाळला नसता तर हा एक उत्तम थ्रिलर पट झाला असता. जर तुम्हाला मोहित सुरी स्टाईल चित्रपट आवडत असतील तर हा सिनेमा तुम्हाला आवडेल, पण जर तुम्ही जास्त अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघितला तर नक्कीच निराश व्हाल असं मला वाटतं. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स.

MALANG MOVIE REVIEW

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.