AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Patani House Firing : दिशा पाटणीच्या घरावर फायरिंग करणाऱ्या दोघांचे थेट एन्काउंटर, धाडधाड गोळ्या घातल्या!

Disha Patani House Firing Encounter : प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन संशयित आरोपी चकमकीत ठार झाले आहेत.

Disha Patani House Firing : दिशा पाटणीच्या घरावर फायरिंग करणाऱ्या दोघांचे थेट एन्काउंटर, धाडधाड गोळ्या घातल्या!
disha patani house firing case
| Updated on: Sep 17, 2025 | 9:23 PM
Share

Disha Patani House Firing Encounter : गेल्या काही दिवसांपासून दिशा पाटणी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे उत्तर प्रदेश तसेच बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन आरोपींचे नाव समोर आले होते. दरम्यान, आता याच घटनेतील या दोघांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी चकमकीत ठार केल्याचे समोर आले आहे. या दोघांचेही एन्काऊंटर झाले आहे.

गाझियाबाद येथे आरोपी-पोलिसांत झाली चकमक

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचे एन्काऊंटर केले आहे. एन्काऊंटर करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव रविंद्र उर्फ कल्लू आणि दुसऱ्या आरोपीचे नाव अरुण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या एसटीएफ पथकात आणि या आरोपींमध्ये गाझियाबाद येथे चकमक झाली. याच चकमकीत ते दोघेही मारले गेले आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार दोन्ही आरोप रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगचे सक्रीय सद्सय होते. बरेली जिल्ह्यात दिशा पाटणी हिचे घर आहे. याच घरावर 12 सप्टेंबरच्या रात्री गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

दोन्ही आरोपी हरियाणाचे रहिवासी

दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बरेलीचे पोलीस तसेच उत्तर प्रदेशची एसटीएफ या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. पोलिसांकडून अनेक सीसीटीव्ही तपासण्यात आले. सीसीटीव्ही तसेच क्राइम रेकॉर्ड्स तपासून पोलिसांनी या दोन आरोपींची ओळख पटवली होती. हो दोन्ही आरोपी हरियाणाचे रहिवासी होते. आता पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला आहे.

एन्काऊंटर नेमके कसे केले?

मिळालेल्या माहितीनुसार आज युपी एसटीएफला या आरोपींचा माग लागला होता. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या नोएडा युनिटने तसेच दिल्लीच्या सीआय युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. त्यांच्या एका टीमने गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी येथे आरोपींना गाठले. तिथे आरोपी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. यात रविंद्र आणि अरूण जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.