Ujjwal Nikam : मी 17 वर्षांचा! कसाबनं केलेला दावा, उज्जवल निकम यांनी हाणून पाडलेला दहशतवाद्याचा डाव, लढवलेली शक्कल

Ujjwal Nikam On Ajmal Kasab : उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत कसाबबद्दल भाष्य केलं असून त्याच्या डाव कसा हाणून पाडला याबद्दल सांगितलं आहे.

Ujjwal Nikam : मी 17 वर्षांचा! कसाबनं केलेला दावा, उज्जवल निकम यांनी हाणून पाडलेला दहशतवाद्याचा डाव, लढवलेली शक्कल
| Updated on: Oct 14, 2026 | 6:25 PM

‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात २६/११ मुंबई हल्ल्यात पकडलेल्या कुख्यात दहशतवादी अजमल कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबची केस लढवली. त्याला फाशीपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. या चित्रपटात राजकुमार रावनं उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल यांनी कसाबच्या खटल्यामागील कहाणी उघड केली आहे. उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, कसाबला सिगारेट आणि मटण बिर्याणीचं व्यसन होतं. तो मनगटावर पवित्र धागा बांधायचा. त्यांनी सांगितलं की, कसाबबद्दलचे हे सर्व तपशील खरे आहेत. राजकुमार रावनं सांगितलं की, लोकांना चित्रपटात कसाबबद्दल अशी माहिती मिळेल, जी माहिती कोणत्याही पोर्टलवर उपलब्ध नाही. जेव्हा अभिनेत्याला कसाबबद्दल समजलं, तेव्हा त्याला धक्का बसला. लोकांनी हा चित्रपट पाहणं खूप महत्त्वाचं आहे.

Loading...

कसाब अल्पवयीन होता का?

न्यायालयीन सुनावणीदरम्यान कसाबनं आपण अल्पवयीन असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं आपण १७ वर्षांचा असल्याचा दावा केला होता. उज्ज्वल निकम यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कसाबचं वय निश्चित करण्यासाठी त्यांनी बोन मॅरो चाचणीचा प्रस्ताव मांडला. ही कल्पना कशी सुचली हे स्पष्ट करताना निकम म्हणाले, ‘मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो आणि मला त्याबद्दल माहिती होती. त्यानं आपण अल्पवयीन असल्याचा दावा करताच मला धक्का बसला. मी सर्वांसमोर बोन मॅरो चाचणीचा प्रस्ताव मांडला. त्या चाचणीतून तो अल्पवयीन नसल्याचं उघड झालं. कसाबचं बोलणं चुकीचं ठरलं.’

उज्ज्वल यांनी सांगितलं की, कसाबची केस लढवल्याबद्दल त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली होती. उज्ज्वल यांनी सांगितलं की, त्यांच्या आईची इच्छा होती की, त्यांनी डॉक्टर व्हावं आणि वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावं. निकम यांना स्वतःला न्यायाधीश व्हायचं होतं, पण वडिलांच्या नकारानंतर ते वकील होण्यास तयार झाले. निकम यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगाही वकील आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us