AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फी जावेदला साडीत पाहून बसला आश्चर्याचा धक्का; मात्र नंतर जे घडलं ते पाहून म्हणाले ‘ही कधीच सुधारणार नाही’

उर्फीला साडीत पाहूनही नेटकरी का म्हणाले "ही सुधारणार नाही"?

उर्फी जावेदला साडीत पाहून बसला आश्चर्याचा धक्का; मात्र नंतर जे घडलं ते पाहून म्हणाले 'ही कधीच सुधारणार नाही'
Urfi Javed Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 11, 2022 | 2:56 PM
Share

मुंबई: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तुम्हाला आवडत असो किंवा नसो, सोशल मीडियावर तुम्ही तिला दुर्लक्ष करू शकत नाही. अत्यंत बोल्ड आणि हटक्या ड्रेसिंग सेन्समुळे ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. याच फॅशनमुळे इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. उर्फीला नेटकऱ्यांनी कधीच साध्या कपड्यांमध्ये पाहिलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी ती साडी नेसलेली पहायला मिळते, तेव्हा नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. उर्फीने नुकतंच असंच काहीसं केलं आहे. मुंबई एअरपोर्टवर ती चक्क साडी नेसून पोहोचली होती.

उर्फीला साडीत पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तिच्या या लूकची काहींनी प्रशंसासुद्धा केली. इतकंच नव्हे तर तिने पापाराझींसाठी पिझ्झासुद्धा आणले होते. फोटोग्राफर्सची काळजी घेतल्याबद्दल नेटकऱ्यांनी उर्फीचं कौतुक केलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून पुन्हा नेटकरी म्हणाले, “ही कधीच सुधारणार नाही”.

फोटोग्राफर्स आणि पापाराझींना पिझ्झा वाटल्यानंतर उर्फीने फोटोसाठी पोझ दिले. मात्र एअरपोर्टवर हवा इतकी होती, की त्यामुळे तिच्या साडीचा पदरच उडू लागला. असं एकदा नाही तर एअरपोर्टच्या गेटच्या आत जाईपर्यंत झालं होतं. साडीचा पदर सांभाळायला उर्फीला चांगलीच कसरत करावी लागली. अखेर एका महिलेनं तिची मदत केली. 

उर्फीला पूर्ण कपड्यांमध्ये फारच क्वचित पाहिलं जातं. मात्र साडी नेसल्यानंतरही तिचा पदर सारखा उडत असल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा तिला ट्रोल केलं. “सुरुवातीला वाटलं की हिला आज काय झालं? पण नंतर पूर्ण व्हिडीओ पाहून समजलं की ही कधीच सुधारणार नाही”, असं एकाने म्हटलं. तर उर्फीच्या शरीराला पूर्ण कपडे घालायची सवय नाही, अशी खिल्ली दुसऱ्या युजरने उडवली.

उर्फीकडे साधं एक सेफ्टी पिन नव्हतं का, इतकी गरीब आहे का ही, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली. कदाचित तिला सेफ्टी पिन्सविषयी माहीतच नसेल, असंही काहींनी म्हटलंय.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.