AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Case: ‘त्याने तिची फसवणूक केली असेल पण..’; तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फीची पोस्ट चर्चेत

तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फी जावेदचा शिझानला पाठिंबा; म्हणाली "तो चुकला असेल पण.."

Tunisha Case: 'त्याने तिची फसवणूक केली असेल पण..'; तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फीची पोस्ट चर्चेत
तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फी जावेदची पोस्टImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2022 | 9:46 AM
Share

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स-बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली. शिझानने तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून फसवलं, असा आरोप तिच्या आईने केला. एकीकडे शिझान आणि तुनिशाच्या नात्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता अभिनेत्री उर्फी जावेदची पोस्ट चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये याविषयी भलीमोठी पोस्ट लिहित आपलं मत मांडलंय.

उर्फी जावेदची पोस्ट-

‘तुनिशा आत्महत्या प्रकरणी माझं मत- होय, तो चुकला असेल, त्याने तिची फसवणूक केली असेल पण तिच्या मृत्यूसाठी आपण त्याला दोष देऊ शकत नाही. ज्याला तुमच्यासोबत राहायचं नाही, त्याला तुम्ही सोबत राहण्यासाठी बळजबरी करू शकत नाही,’ असं तिने लिहिलंय.

‘मुलींनो, तुमचा मौल्यवान जीव देण्यालायक कोणीच म्हणजे कोणीच नसतं. सर्वकाही संपलंय असं कधीतरी वाटू शकतं, पण खरंच सर्वकाही संपलेलं नसतं. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा किंवा स्वत:वर थोडं आणखी प्रेम करण्याचा प्रयत्न करा. स्वत:चेच हिरो व्हा. थोडा वेळ घ्या. आत्महत्येनंतरही त्रास संपत नाही, जे लोक तुमच्या जवळचे असतात त्यांना अधिक त्रास असतो’, असा सल्ला तिने तरुणींना दिला आहे.

तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणात अटकेत असलेल्या शिझानला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. चौकशीदरम्यान शिझान वारंवार त्याचा जबाब बदलत आहे आणि तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

तुनिशाशिवाय शिझानचे इतर महिलांसोबतही संबंध होते, असा आरोप अभिनेत्री आणि तुनिशाची मैत्रीण राया लबिबने केला होता. वासनेची भूक मिटवण्यासाठी त्याने शिझानने अनेक महिलांचा वापर केला, असा ती म्हणाली.

Follow Us
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर