AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tehran: पहिल्या मिनिटापासून खिळवून ठेवणारी इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित ही वेबसीरीज नक्की पहा, काही दिवसापूर्वी निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू

Tehran: अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे कारवाई करत इराणवर भीषण हल्ल्यानंतर जगात तणावग्रस्त वातावरण आहे. दरम्यान, ठेवणारी इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित ही वेबसीरीज नक्की पहा, काही दिवसापूर्वी प्रोड्यूसरचा संशयास्पद मृत्यू झालाय...

Tehran: पहिल्या मिनिटापासून खिळवून ठेवणारी इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित ही वेबसीरीज नक्की पहा, काही दिवसापूर्वी निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू
Tehran
| Updated on: Mar 02, 2026 | 10:59 AM
Share

Tehran: जगाला ज्या दिवसाची भीती होती, ते अखेर होत आहे. अमेरिका-इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे कारवाई करत इराणवर भीषण हल्ला केला आहे. सगल तीन दिवस युद्ध सुरु आहे. याचे पडसाद आता दिसू लागले आहेत. या तणावग्रस्त वातावरणात एक सिरीज चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या जगात जी तणावग्रस्त परिस्थिती आहे, त्याच परिस्थितीशी मिळती – जुळती वेब सिरीज आता चर्चेत आली आहे. ‘तेहरान’ असं वेब सिरीजचं नाव आहे. ही इस्रायली गुप्तचर थ्रिलर सिरीज इराण-इस्रायलमधील शत्रुत्व, हेरगिरी आणि अणुकार्यक्रमावर केंद्रित आहे, जी सध्याच्या घटनांशी खूप संबंधित आहे. 2020 मध्ये ॲपल टीव्ही + वर प्रदर्शित झाली होती. अंतराष्ट्रीय स्तरावर सिरीजचा विषय ठरलेली असताना, चौथ्या सिझनच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे…

सिरीजची कथा मोसाद एजेंट तमार रबिनयान भोवती फिरताना दिसत आहे. जी एक इराण मूळ इस्रायली महिली आहे. महिला तेहरान याठिकाणी खोटी ओळख बनवून घुसते आणि परमाणू रिएक्टर नष्ट करण्याचा प्रयत्न करते. या सिरीजमध्ये सायबर हल्ले, गुप्त कारवाया, हत्या आणि प्रॉक्सी युद्धे दाखवली आहेत जी आजच्या इराण-इस्रायल संघर्षाशी आश्चर्यकारक साम्य दर्शवतात.

‘तेहरान’ सिरीजची प्रासंगिकता फक्त काल्पनिक नाही. सिरीजमध्ये वास्तवीक राजनीती दाखवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. या सिरीजचे निर्माते मोशे झोंडर यांनी 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील संघर्षांवर आधारित असल्याचं वर्णन केलं आहे. पहिल्या सीझनमध्ये, तमारचे ध्येय इराणच्या पॉवर ग्रिडवर सायबर हल्ल्याने सुरू होते, जे 2021 मध्ये इराणच्या नतांझ अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या प्रत्यक्ष सायबर हल्ल्यासारखेच आहे, ज्यासाठी इस्रायलला दोषी ठरवण्यात आलं होतं.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये लेबनॉन आणि गाझामधील सध्याच्या संघर्षांशी जोडलेल्या हिजबुल्लाह आणि हमास सारख्या प्रॉक्सी शक्तींच्या भूमिकेचा शोध घेतला जातो. या काळात, “तेहरान” सारख्या सिरीज केवळ मनोरंजनच करत नाहीत तर जटिल भू-राजकीय समस्यांचे स्पष्टीकरण देण्यास देखील मदत करतात.

‘तेहरान’ च्या निर्मात्यांचं निधन

सिरीजच्या निर्मात्या डाना एडन यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. 52 वर्षीय डाना एडन, ज्या इस्रायली टीव्हीच्या प्रमुख आहे… 16 फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रीस येथील एथेंसच्या एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळल्या. ‘तेहरान’च्या चौथ्या सीझनच्या शुटिंग दरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाना एडन यांनी आत्महत्या केली आहे… ही आत्महत्या आहे की दुसरंच काही कारण आहे? याची चौकशी पोलीस करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...