AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’च्या लाटेतही ‘या’ चित्रपटाची जबरदस्त कामगिरी; शोज हाऊसफुल, थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट

सध्या सर्वत्र रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी बॉक्स ऑफिसवर आणखी एक चित्रपट दमदार कामगिरी करतोय. 'धुरंधर 2'ची लाट असतानाही या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे.

'धुरंधर 2'च्या लाटेतही 'या' चित्रपटाची जबरदस्त कामगिरी; शोज हाऊसफुल, थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 2:13 PM
Share

थिएटरमध्ये जेव्हा एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित होणारा असतो, तेव्हा नुकसान टाळण्यासाठी सहसा त्याच दिवशी दुसरा चित्रपट प्रदर्शित केला जात नाही. 19 मार्च रोजी रणवीर सिंहचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या सीक्वेलची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे साहजिकच बॉक्स ऑफिसवर त्याची जबरदस्त ओपनिंग होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला होता. या चित्रपटासोबत जर टक्कर झाली तर नुकसान टाळणं अशक्य असल्याचं अनेकांनी मान्य केलं. हाच विचार करत ‘केजीएफ’ स्टार यशने त्याच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं होतं. परंतु दुसऱ्या एका साऊथ सुपरस्टारने ‘धुरंधर 2’ला न जुमानता त्याच दिवशी म्हणजेच 19 मार्च रोजी थिएटरमध्ये आपला चित्रपट प्रदर्शित केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ची लाट असतानाही हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करतोय. या चित्रपटाचं नाव आहे ‘उस्ताद भगत सिंह’.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट फक्त तेलुगू भाषेतच प्रदर्शित करण्यात आला आहे. एकाच भाषेत प्रदर्शित करूनही, ‘धुरंधर 2’शी टक्कर असूनही या चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, पवन कल्याण यांच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर कमाईत घट झाल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी 9 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 9.15 कोटी रुपये कमावत गेल्या तीन दिवसांत आकडा जवळपास 52.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

उस्ताद भगत सिंह या चित्रपटाला परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन 62.42 कोटी रुपये इतकं झालं आहे. तर परदेशातील कमाईचा आकडा जवळपास 9.25 कोटी रुपये इतका आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 71.67 कोटी रुपये कमावले आहेत. फक्त एकाच भाषेत प्रदर्शित करूनही इतकी कमाई करणं आश्चर्यकारक मानलं जात आहे. दुसरीकडे रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने गेल्या तीन दिवसांत कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. उस्ताद भगत सिंह हा अॅक्शन ड्रामा असून त्याचा रनटाइम 2 तास 34 मिनिटांचा आहे. यामध्ये पवन कल्याण यांच्यासोबतच नवाब शाह, आर. प्रतिभन, श्रीलीला, राशी खन्ना यांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.