AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीशी ब्रेकअपमुळे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू चर्चेत, ‘त्या’ फोटोमुळे चाहते हळहळले

Veer Tara Breakup : अभिनेत्री क्रिती सॅनन हिची बहीण नुपूर सॅनन आणि स्टेबिन बेनचं रिसेप्शन नुकतंच मुंबईत झालं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावून दोघांना शुभेच्छा दिल्या. त्या पार्टीत माजू मुख्यमंत्र्यांचा नातूही आला होता,. मात्र त्याला एकटंच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो एकटाच आल्याचे फोटो -व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तो आणि त्याची गर्लफ्रेंड वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्रीशी ब्रेकअपमुळे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू चर्चेत, 'त्या' फोटोमुळे चाहते हळहळले
| Updated on: Jan 14, 2026 | 11:58 AM
Share

Veer Pahariya Tara Sutaria Breakup : अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नुपूरचं नुकतंच लग्न झालं. स्टीबिन बेन शी थाटात विवाह केला. त्यानंतर मुंबईत त्यांचं रिसेप्शन पार पडलं. त्याची खूप चर्चा झाली, अनेक सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावत नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा दिल्या. हे रिसेप्शन एका स्टारस्टंड इव्हेंट होता, जिथे सर्वांच्या नजरा नवीन जोडप्यावर होत्या. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, अभिनेता वीर पहारिया (Veer Paharia) देखील या पार्टीत सामील झाला आणि त्याने वधू-वरांचे अभिनंदन केले.

मात्र या पार्टीत सगळ्यात जास्त लक्ष त्यानेचं वेधलं, कारण तो या पार्टीमध्ये एकटाच आला होता. पार्टीतील व्हिडिओंमध्ये, वीर पहाडिया पूर्णपणे काळ्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होता. त्याने प्रथम स्टेबिनचे स्वागत केले आणि नंतर नुपूरला मिठी मारली आणि तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तो दोघांशीही प्रेमाने वगला, बराच वेळ बोलतही होता. यानंतर तो क्रितीला भेटला आणि तिला मिठी मारली, पण वीरला असे एकटे पाहून चाहते दु:खी झाले.

रिसेप्शनमध्ये वीर पहारियाला एकटं पाहून चाहते हळहळले

अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकत्र होतं. मात्र त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चाहते निराश झाले. गेल्या वर्षी ते दोघे एकत्र दिसू लागले, मग त्यांनी त्यांचं नातं सार्वजनिक केलं, तव्हापासून वीर आणि तारा चर्चेत होते. ते अनके इव्हेंट्स, पार्टीज आणि कॉन्सर्टमध्येही एकत्र दिसले. सोशल मीडियावरही अनेक चाहत्यांना त्यांची जोडी आवडत होती. त्यांचे फोटो आणि विविध व्हिडीओ सतत व्हायरल व्हायचे. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्याने चाहते हैराण झाले.

व्हेकेशनवर एकटाच गेला वीर

वीर पहाडिया अलीकडेच एका छोट्या सुट्टीवरून परतताना दिसला. खाजगी विमानतळावरून तो त्याच्या गाडीकडे घाईघाईने जाताना दिसला. या काळात तारा सुतारिया त्याच्यासोबत दिसली नाही, जे लोकांच्या लगेच लक्षात आले. नंतर, वीर त्याचा भाऊ शिखर पहारिया आणि त्याची मैत्रीण जान्हवी कपूरसोबत दिसला. तारा या प्रवासात त्यांच्यासोबत नव्हती असं तेव्हापासून मानलं जात ाहे.

एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टपासून सुरू झाला वाद

हा सगळा वाद काही दिवसांपूर्वी सुरू झाला जेव्हा, मुंबईत एपी ढिल्लों याच्या कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओतील एका एडिटेड क्लिपने बराच वाद सुरू झाला. खोट्या बातम्या, चुकीचं एडिटिंग आणि ऑनलाइन बलुंगने फरक पडत नाही, असं त्यावर ताराने स्पष्ट केलं होतं. त्याच वेळी, वीर पहारियाने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. व्हायरल झालेला फोटो एका वेगळ्या गाण्याच्या दरम्यान घेण्यात आला होता, जो चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आला असं त्याने स्पष्ट केलं.

मात्र त्यानंतर अचानक दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं दिसलं.

अधिकाऱ्यांची विश्रांती अन् विनातपासणी वाहनांची संभाजीनगरात एन्ट्री!
अधिकाऱ्यांची विश्रांती अन् विनातपासणी वाहनांची संभाजीनगरात एन्ट्री!.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू
ठाणे महापालिका निवडणुकीच्या 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू.
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप.
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य.
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी.
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा.
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद.
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप.
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका.
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!.