Vijay Varma: तमन्ना भाटियानंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात, ११ वर्षांनी लहान मु्स्लिम अभिनेत्रीसोबत थाटणार संसार?
Vijay Varma New Girlfreind: विजय वर्मा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. आता पुन्हा विजय वर्माच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाली आहे. तिच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Vijay Verma Affairs: बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. या अभिनेत्याचे नाव गायिका आणि ‘जवान’ चित्रपटाची नायिका आलिया कुरेशीसोबत जोडले जात आहे. त्यांच्या नात्याच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत, मात्र विजय किंवा आलिया या दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. आता, आलियाच्या एका विशेष कार्यक्रमातील व्हिडिओमुळे या अफवांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.
आलिया कुरेशीच्या ‘झल्ली’ या अल्बमच्या प्रकाशनाचा सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईत एका विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विजय वर्मानेही हजेरी लावली होती. पार्टीमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आलिया गाणं गातं आहे तर विजय तिला रेकॉर्ड करत आहे. आलिया गात असताना, विजय तिला प्रोत्साहन देण्यासाठी शिट्टी वाजवताना आणि मोठ्याने टाळ्या वाजवताना दिसला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, आलियाचा मधुर आवाज ऐकून विजय हसताना दिसत आहे. अभिनेता इतका तल्लीन झाला होता की त्याने आलियाचा परफॉर्मन्स आपल्या फोनवर रेकॉर्डही केला. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव आणि गायिकेबद्दलचा उत्साह पाहून लोक तो तिच्या प्रेमात असल्याचे म्हणत आहे.
विजय वर्मा आणि आलिया कुरेशी यांच्यातील नात्याबद्दलच्या चर्चा २०२६ पासून सुरु झाल्य. हे दोघे अनेक सार्वजनिक प्रसंगी एकत्र दिसले होते. एकदा ते एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असल्याचे फोटो समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. असे असूनही, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे चर्चा केलेली नाही. विजय वर्मा यापूर्वीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे.
याआधी विजयचे नाव हे तमन्ना भाटियाशी जोडले गेले होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते दोघे वेगवेगळे झाले, यानंतर विजयचे नाव अभिनेत्री फातिमा सनाशी जोडले गेले. आता विजय त्याच्यापेक्षा वयाने ११ वर्षे लहान असलेल्या मुस्लिम मुलीशी संसार थाटणार का यावर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
