AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील ख्रिश्चन आणि आई शीख, भाऊ मुस्लीम… ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या कुटुंबात सर्व धर्माचे सदस्य, संपत्ती तर थक्क करणारी

झगमगत्या विश्वात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना स्वतःच्या धर्माबाहेर लग्न केलं. तर काहींनी दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला... एका अभिनेत्याच्या घरात देखील अनेक धर्माचे लोक एकत्र राहत आहेत... तर जाणून घ्या त्याच्या कुटुंबियांबद्दल...

वडील ख्रिश्चन आणि आई शीख, भाऊ मुस्लीम... 'या' लोकप्रिय अभिनेत्याच्या कुटुंबात सर्व धर्माचे सदस्य, संपत्ती तर थक्क करणारी
| Updated on: Apr 03, 2026 | 10:32 AM
Share

इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार असे आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात भक्कम ओळख निर्माण केली आहे. सुरुवात टीव्ही विश्वातून केल्यामुळे त्यांच्या अभिनय आणखी फुलला आणि लोकप्रियता देखील वेगळ्या उंचीवर पोहोचली. अशात अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे विक्रांत मेसी… विक्रांत याने सुरुवात टीव्ही विश्वातून केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज अभिनेता 38 वा वाढदिवस साजरा करत आहे… विक्रांत याने 2007 मध्ये ‘धूम मचाओ धूम’ शोमध्ये दिसला. त्यानंतर अभिनेता ‘धरम वीर’ आणि ‘बालिका वधू’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिकेत दिसला… त्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूड आणि ओटीटीवर देखील पदार्पण केलं.

विक्रांत याच्याबद्दल आज जवळपास सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल आणि त्यांच्या धर्माबद्दल फार कोणाला माहिती नाही. विक्रांत मेसी याच्या घरात वेगवेगळ्या धर्माचे लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने राहतात… विक्रांत मेसी याचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई शीख आहे… अभिनेत्याच्या भावाने तर, कमी वयातच इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे…

अभिनेत्याच्या बायकोबद्दल सांगायचं झालं तर, विक्रांत मेसी याची पत्नी हिंदू आहे… तिचं नाव शितल ठाकूर असं आहे.. विक्रांत याच्या घरात प्रत्येक सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो… घरातील अशा सकारात्मत वातावरणामुळे विक्रांत याचे विचार प्रगल्भ आहेत.

विक्रांत याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत 20 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे… ‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’, ‘लव्ह हॉस्टल’ आणि ’12 th फेल’ मध्ये देखील अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली. ’12 th फेल’ सिनेमामुळे तर, अभिनेत्याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत अधिक वाढ झाली… शिवाय अनेत वेब सीरीजमध्ये देखील विक्रांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.

‘मिर्झापूर’, ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब सीरिज तर अभिनेत्याच्या करीयरसाठी फार महत्त्वाच्या ठरल्या… आता येत्या काळात अभिनेत्याने अनेक  सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘यार जिगरी’ आणि  ‘हसीन दिलरूबा 3’ ओटीटी प्रदर्शित  होणार आहे. तर ‘तलाखों में एक’, ‘व्हाइट’ आणि  ‘मुसाफिर कैफे’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.

विक्रांत मेसी याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, एका सिनेमासाठी अभिनेता तब्बल 1 ते 1.5 कोटी रुपये घेतो…  तर अभिनेत्याची संपत्ती 20 ते 25 कोटी रुपये असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.