Vinod Khanna : 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले विनोद खन्ना; विवाहित असूनही…

Vinod Khanna Affair : विनोद खन्ना एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा झालेल्या.

| Updated on: Nov 24, 2026 | 3:29 PM
1 / 5
विनोद खन्ना यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. एकेकाळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्यांनाही त्यांनी मागे टाकलं होतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. विवाहित असूनही, ते त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्रीसोबतच्या विवाहबाह्य संबंधांमुळे चर्चेत होते.

2 / 5

कलाकारांमधील प्रेमप्रकरणं किंवा विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा खूप जुना आहे. या प्रकरणात विनोद खन्नांचं नावही जोडलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 1988 मध्ये घडली. विनोद त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या अमृता सिंगसोबत 'बंटवारा' चित्रपटाचं शूटिंग करत होते.

3 / 5

अमृता सिंग यांचं नाव विनोद खन्ना यांच्यासोबत जोडलं गेलेलं. 'बंटवारा'च्या शूटिंगदरम्यान विनोद आणि अमृता एकमेकांच्या जवळ आले. 'बंटवारा'चं शूटिंग राजस्थानमध्ये झालं होतं आणि पहिल्या शेड्यूलदरम्यान विनोद खन्ना कोणाशीही फारसे बोलत नव्हते. पण जसजसं चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं काम सुरू झालं, तसतशा गोष्टी बदलू लागल्या.

4 / 5

विनोद आणि अमृता सिंग एकमेकांच्या अधिक जवळ आले. विनोद आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि विवाहित आहे हे अमृता यांना माहित असूनही त्या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या.

5 / 5

रिपोर्टनुसार, अमृता सिंग आणि विनोद खन्ना बऱ्याच काळापासून गुपचूप एकमेकांना डेट करत होते, पण त्यांची प्रेमकथा कधीच पूर्ण झाली नाही. काही वर्षांनंतर विनोद खन्ना आणि अमृता यांचा ब्रेकअप झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us