AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सनातन’मुळे चर्चेत, कोण आहेत मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे?

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. लिंबाळे यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामाजिक इतिहास, जातिव्यवस्था, सांस्कृतिक संघर्ष आणि वंचित समूहांचे जगणे यांचे चित्रण आढळते.

'सनातन'मुळे चर्चेत, कोण आहेत मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे?
Sharankumar LimbaleImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 3:16 PM
Share

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. आज साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून, शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले आहे.  ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक अशी त्यांची ओळख आहे.

कोण आहेत शरणकुमार लिंबाळे? 

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावात 1 जून 1956 रोजी शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म झाला. सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता आणि वंचित समूहांच्या जगण्यातील संघर्ष यांचे वास्तव त्यांनी बालपणापासून अनुभवले. त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत या अनुभवांचा मोठा वाटा राहिला. पुढे याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला आशय, दिशा आणि वैचारिक अधिष्ठान दिले.

लिंबाळे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर 1986 ते 1992 या काळात त्यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली.

लिंबाळे यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामाजिक इतिहास, जातिव्यवस्था, सांस्कृतिक संघर्ष आणि वंचित समूहांचे जगणे यांचे चित्रण आढळते. ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘सनातन’ आणि ‘रामराज्य’ या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. ‘दलित ब्राह्मण’, ‘देवता आदमी’ हे त्यांचे कथासंग्रह चर्चेत राहिले. ‘उद्रेक’, ‘ओ’ आणि ‘यलगार’ या कविता आणि काव्यलेखनातूनही त्यांनी सामाजिक वास्तवाला अभिव्यक्ती दिली.  त्यांच्या लेखनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा ही मूल्ये त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत.

लिंबाळे यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘सनातन’ ही कादंबरी. २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीतून त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पट उलगडला. अस्पृश्य समाजाचे जगणे, त्यांचा संघर्ष, इतिहासातील योगदान आणि सामाजिक व्यवस्थेतील स्थान यांची व्यापक मांडणी या कादंबरीत त्यांनी केली आहे.

Follow Us
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!