AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Farmer Certificate: महिला शेतकरी प्रमाणपत्र हवंय? मग घरबसल्या मोबाईलवरुन असा करा ऑनलाईन अर्ज

Women Farmer Certificate: शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील महिलांना नवीन ओळख देण्यासाठी राज्य सरकारने महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लाखो महिला त्याचा फायदा घेत आहे. आता तुम्ही सुद्धा घरबसल्या हे प्रमाणपत्र मोबाईलआधारे काढू शकता.

Women Farmer Certificate: महिला शेतकरी प्रमाणपत्र हवंय? मग घरबसल्या मोबाईलवरुन असा करा ऑनलाईन अर्ज
महिला शेतकरी प्रमाणपत्र हवंय? मोबाईलवरुन असा करा ऑनलाईन अर्ज
| Updated on: Nov 24, 2026 | 3:11 PM
Share

Women Farmer Certificate: राज्यातील महिला शेतकर्‍यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधेयक मंजूर झाले आहे.शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील महिलांना नवीन ओळख देण्यासाठी राज्य सरकारने महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लाखो महिला त्याचा फायदा घेत आहे. आता तुम्ही सुद्धा घरबसल्या हे प्रमाणपत्र मोबाईलआधारे काढू शकता. कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येते.

मोबाईलवरून अर्ज करण्याची सोपी पद्धत

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वात अगोदर कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला Krishi.maharashatra.gov.in ला भेट द्या. या पोर्टलवरील ‘अर्ज करा’ हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार कार्डवरील नावाप्रमाणे पूर्ण नाव आणि १२ अंकी आधार क्रमांक नोंदवा. जिल्हा, तालुका आणि तसेच राहण्याचे आणि प्रत्यक्ष शेतीचे काम सुरू असलेले गाव निवडा. ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी ओटीपी टाका. पडताळणी पूर्ण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा हा ओटीपी केवळ पाच मिनिटांसाठीच वैध असतो. त्याच काळात तो नोंदवणे आवश्यक आहे. तुमचा कायमचा पत्ता, सक्रिय मोबाईल क्रमांक, जात प्रवर्ग, गाव आणि इतर अत्यावश्यक माहिती जमा करा.

कृषी कामाचे स्वरूप आणि शेतकरी आयडी

आता या अर्जात पीक लागवड, बियाणे उत्पादन, पशुपालन, फलोत्पादन, कुक्कुटपालन, शेतमजूरी यासारख्या शेती आणि शेतीपुरक कामांपैकी लागू असलेले पर्याय निवडता येतील. कुटुंबातील सदस्याचा शेतकरी आयडी उपलब्ध असल्यास तो तुम्ही नोंदवू शकता. नसल्यास पर्यायापुढे नाही, असा पर्याय निवडण्याची सोय महिला शेतकऱ्यांना आहे. ही माहिती भरणे ऐच्छिक स्वरुपाचे काम आहे. सर्व माहिती व्यवस्थित तपासा. ती एकदा नजरेखाली घाला आणि स्वघोषणेवर टिक केल्यानंतर हा अर्ज सबमिट करा.

या महिलांना शेतकरी म्हणून दर्जा

शेतात काम करणाऱ्या महिला, बीज उत्पादन क्षेत्रातील महिला, पशूसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, मासेमारी, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी वनीकरण, चराई व्यवसायातील महिला, कंपोस्ट खत व्यवसायातील महिला, बटाईदार महिला आणि शेतीशी संबंधित जोड व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

Follow Us
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!